दुबई : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्कियाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत वेगवान चेंडू टाकल्याचे आता समोर आले आहे. मात्र, सामना संपेपर्यंत आपल्याला याबाबत काहीच माहीत नव्हते, असे नॉर्कियाने म्हटले आहे. पण आत्तापर्यंतच्या सर्व आयपीएलच्या मोसमांमध्ये कोणत्या गोलंदाजाने सर्वात वेगवान चेंडू टाकलाआहे, पाहा संपूर्ण खेळाडूंची यादी…

आयपीएलमध्ये २६ वर्षीय नॉर्किया दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. त्याने बुधवारी राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला तिसऱ्या षटकात ताशी १५६.२ किमी वेगाने चेंडू टाकला. हा आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वांत वेगवान चेंडू ठरला. यापूर्वी, हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्याच डेल स्टेनच्या नावावर होता. २०१२च्या मोसमात स्टेनने ताशी १५४.४ किमी वेगाने चेंडू फेकला होता. नॉर्किया म्हणाला, की ज्या वेळी हा चेंडू टाकला, त्या वेळी मला सर्वांत वेगवान चेंडू टाकल्याबद्दल माहीत नव्हते. मात्र, मला हे नंतर कळाले. जेव्हा नॉर्किया ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते.

चेंडू अधिक वेगाने टाकण्यासाठी मेहनत घेत असल्याचे नॉर्कियाने सांगितले. याबाबत तो म्हणाला, ‘गेल्या दोन मोसमांपासून मी वेग वाढविण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. वेगाने गोलंदाजी करण्याबरोबरच अचूक टप्प्यावर मारा करणेही खूप महत्त्वाचे असते. सर्वांत वेगवान चेंडू टाकून नॉर्कियाला फायदा झाला नाही. त्याने टाकलेल्या सर्वांत वेगवान चेंडूवर बटलरने चौकार लगावला. नंतर नॉर्कियानेच बटलरचा त्रिफळा उडविला. तो चेंडू नॉर्कियाने ताशी १५५ किमी वेगाने टाकला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान चेंडू पाकिस्तानच्या शोएब अख्तरने टाकला आहे. त्याने २००२मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डेमध्ये ताशी १६१ किमी वेगाने चेंडू टाकला होता.

२०१२पासून प्रत्येक मोसमातील सर्वांत वेगवान चेंडू टाकणारे गोलंदाज वर्ष गोलंदाज वेग (ताशी किमी)२०१२ डेल स्टेन १५४.४०
२०१३ शॉन टेट १५३.४३
२०१४ डेल स्टेन १५२.४४
२०१५ मिचेल जॉन्सन १५१.११
२०१६ जेसन होल्डर १५०.३१
२०१७ पॅट कमिन्स १५३.५६
२०१८ जोफ्रा आर्चर १५२.३९
२०१९ कॅगिसो रबाडा १५४.२३
२०२० अॅनरिक नॉर्किया १५६.२२

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here