दुबई: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या दिनेश कार्तिकने आपले कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे या सामन्यापासून कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपद आता इऑन मॉर्गनकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने कर्णधार बदलल्यावर संघात नेमका काय बदल घडतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. कार्तिकने यावेळी स्वत:हून कर्णधापद सोडल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

यावर्षीचे आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाइट रायडर्स संघाचे कर्णधारपद दिनेश कार्तिककडून काढून घेतले जाऊ शकते, अशी चर्चा रंगली होती. भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी याबाबत एक सुचक वक्तव्यही केलं होतं. या आयपीएलपूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात दिनेश आणि अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल यांच्यामध्ये वाद झाल्याचे म्हटले जात होते. रसेलला फलंदाजीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर यायचे होते, पण दिनेश त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवत नव्हत्या. या गोष्टीमुळे संघातील वातावरण बिघडल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे दिनेशने कर्णधारपद सोडण्यामागे हेच कारण असल्याचे म्हटले जात आहे.

मॉर्गनकडे इंग्लंडच्या संघाचे कर्णधारपद आहे. त्याचबरोबर मॉर्गनने इंग्लंडला गेल्या वर्षी विश्वचषकही जिंकवून दिला होता. त्याचबरोबर एक ट्वेन्टी-२० खेळाडू आणि कर्णधार म्हणून मॉर्गनने चांगलेच नाव कमावलेले आहे. त्यामुळे दिनेशने जेव्हा कर्णधापदाचा राजीनामा दिला त्यावेळी कोलकाता नाइट रायडर्सच्या संघापुढे मॉर्गनचा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध होता. त्यामुळे दिनेशने कर्णधारपद सोडल्यावर आता मॉर्गनकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे आता कर्णधार बदलल्यावर संघाची कामगिरी सुधारणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते.

आतापर्यंत आयपीएलमध्ये काही वेळा संघांचे कर्णधारपद बदललेले पाहायला मिळाले आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, आरसीबी, केकेआर, दिल्ली कॅपिटल्स या संघांचे कर्णधारपद बदललेले आपण पाहिले आहे. पण या हंगामात पहिल्यांच एखाद्याचे संघाचे कर्णधारपद बदलल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आता कोलकाता नाइट रायडर्सच्या कामगिरी काय बदल होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here