केकेआरचे सलामीवीर यावेळी संयतपणे खेळत होते. पण यावेळी मुंबईचा वेगवान गोलंदाज बोल्टने केकेआरला पहिला धक्का दिला. पण यावेळी सूर्यकुमारने जी कॅच पकडली ती अफलातून अशीच होती. कारण जोरदार फटक्यावर अशी कॅचही पकडली जाऊ शकते, यावर बऱ्याच जणांना विश्वासही बसला नव्हता.
ही गोष्ट घडली ती तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर. बोल्टने यावेळी वेगवान चेंडू टाकला. या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहुल त्रिपाठीने केला. त्रिपाठीने यावेळी जोरदार फटका लगावला होता. त्यामुळे हा चेंडू चौकार जाईल, असे काही जणांना वाटले होते. पण सूर्यकुमारने यावेळी झेप घेत हा झेल टिपला. त्रिपाठीला यावेळी सात धावांवर समाधान मानावे लागले. पण सूर्यकुमार यादवच्या कॅचची चर्चा यावेळी क्रिकेट विश्वात चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली. सूर्यकुमारने ही कॅच पकडल्यावर जोरदार सेलिब्रेशनही केले आणि त्यामध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू सहभागी झालेले पाहायला मिळाले.
फॉर्मात असलेले फलंदाज, मुख्यतः डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये प्रभावी मारा करणारे गोलंदाज, अशा जमेच्या बाजूंमुळे शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेच्या लढतीत गतविजेते मुंबई इंडियन्स विजयासाठी ‘फेव्हरिट’ समजले जात आहेत. त्यात ‘रोहित शर्मा आणि कंपनी’ने आपले मागील सलग चार सामने जिंकून प्रतिस्पर्ध्यांमध्ये दहशत पसरवली आहे.
ही लढत शेख झाएद स्टेडियमवर होते आहे, जिथे मुंबईचा कर्णधार रोहितने याच मोसमातील दोन अर्धशतके झळकावली आहेत. रोहितने आतापर्यंतच्या लढतींत २१६ धावा कुटल्या असून खासकरून कोलकात्याविरुद्ध खेळताना त्याची कामगिरी अधिक चांगली होते. याच मोसमातील कोलकात्याविरुद्धच्या गेल्या लढतीत रोहितने याच मैदानावर ८० धावांची तडाखेबंद खेळी केली आहे. ज्यामुळे मुंबईने कोलकात्यावर ४९ धावांनी विजय नोंदवला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times