नवी दिल्ली:
ब्रिटनच्या न्यायालयातही दिलासा न मिळाल्यानंतर बुकी याला भारतात आणलं जाणार आहे. चावलावर २००० साली एका क्रिकेट सामन्यादरम्यान फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. अमेरिकेचे माजी गृहसचिव साजिद जावेत यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये चावलाला भारतात आणण्याची परवानगी दिली होती. याविरोधात त्याने तेथील हायकोर्टात दाद मागितली होती. पण त्याला दिलासा मिळाला नाही.

२८ दिवसांत होणार प्रत्यार्पण

सुनावणीदरम्यान न्या. डेव्हिड बीन आणि न्या. क्लाइव्ह लुइस यांनी सांगितले की संजीव चावला यांची याचिका अमान्य केली जाते. भारत-इंग्लंड प्रत्यार्पण करारानुसार त्याला २८ दिवसांच्या आत भारतात पाठवले जावे. सरकारच्या वतीने युक्तिवाद करणारे वकिल मार्क समर यांनी सांगितले की चावलाकडे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय जवळपास उरलेलाच नाही.

स्पेशल सेलमध्ये ठेवले जाणार

हायकोर्टाने भारत सरकारला सांगितले की त्याला विशेष सेलमध्ये ठेवला जावा. जेथे त्याची सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेतली आहेत. यावर भारताच्या वतीने वकीलांनी सांगितलं की त्याची ही मागणी सरकार गांभीर्याने घेईल आणि त्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

२००५ पासून चावला ब्रिटीश नागरिक

न्यायालयात दाखल दस्तावेजानुसार, चावला दिल्लीत एक उद्योगपती होता. तो १९९६ मध्ये बिझनेस व्हिसावर लंडनला गेला. २००० मध्ये त्याचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आला. २००५ मध्ये त्याला युकेचा पासपोर्ट मिळाला आणि आता तो ब्रिटिश नागरिक आहे. त्याला फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएच्या समोर सादर करण्यात आले होते.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here