वाचा-
शारजाच्या छोट्या मैदानावर ही लढत होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत ८ लढतीत ६ मध्ये विजय मिळून गुणतक्त्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर चेन्नई संघाने ८ मध्ये फक्त ३ विजय मिळवला आहे. ते सहाव्या स्थानावर आहे.
या दोन्ही संघात आतापर्यंत २२ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १५ वेळा चेन्नई तर ७ वेळा दिल्लीने विजय मिळवला आहे. आयपीएल २०२०मध्ये २५ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा ४४ धावांनी पराभव केला होता.
वाचा-
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या दिल्लीचे पुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते जखमी खेळाडूंचे होय. ऋषभ पंत जखमी असल्यामुळे तो काही सामने खेळू शकणार नाही. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. फिरकीपटू अमित मिश्रा देखील जखमी आहे तर जलद गोलदाजी इशांत शर्मा स्पर्धेबाहेर झाला आहे.
वाचा-
श्रेयसने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे आणि संघाचे नेतृत्व करत विजय देखील मिळून दिला आहे. या सामन्यात श्रेयस खेळेल की नाही याबद्दल शंका आहे. तो खेळला नाही तर दिल्लीसाठी मोठा सेटबॅक असेल. पंत आणि अय्यर नसल्याने दिल्लीच्या फलंदाजीवर मोठा परिणाम होऊ शकेल. दिल्लीकडे पृथ्वी शॉ आणि शिखर धवन सारखे धडाकेबाज फलंदाज आहे. तर मधळ्याफळीत अजिंक्य रहाणे आणि मार्कस स्टायनेस सारखे खेळाडू आहे.
दुसऱ्या बाजूला चेन्नई संघासाठी गोष्टी थोड्या सोप्या होत चालल्या आहेत. गेल्या सामन्यात चेन्नईची फलंदाजी, गोलंदाजी चांगली झाली होती. धोनीने नाणेफेक जिंकली आणि मग गोष्टी अधिक त्यांच्या बाजूने गेल्या. आता आजच्या सामन्यात देखील दिल्लीचे खेळाडू जखमी असल्याने त्याचा फायदा चेन्नईला होऊ शकतो. त्याच बरोबर पिच फिरकीपटूंना साथ देत आहेत. यामुळे चेन्नईला फायदा होण्याीच शक्यता अधिक आहे. दिल्लीविरुद्ध धोनी पियुष चावला, रविंद्र जडेजा आणि कर्ण शर्मा अशा तीन फिरकीपटूंसोबत खेळू शकतो. यांना दीपक चाहरची चांगली साथ मिळू शकते.
दिल्लीच्या गोलंदाजीची धार आहे कासिगो रबाडा आणि एनरिक नॉर्जे होय. त्याच बरोबर आर अश्विन चेन्नईच्या फलंदाजांना लवकर माघारी पाठवू शकतो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times