सांगली (उद्धव गोडसे)

करोना संसर्ग, जिल्हाबंदी आणि शाळांनी दिरंगाई केल्याने क्रीडा विभागाकडे उशिरा दाखल झालेल्या राज्यातील ३६८ विद्यार्थ्यांच्या ग्रेस गुणांचे प्रस्ताव लटकले आहेत. निर्णयाविना वर्ष वाया जाते की काय? या काळजीने गेल्या वर्षी दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन खळाडूंना पुढील करिअरची संधी द्यावी, असा आग्रह पालकांनी धरला आहे.

वाचा-

मैदानावर प्रत्यक्ष घाम गाळून नैपुण्य दाखवणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी क्रीडा विभागाने खेळाडूंना ग्रेस गुण दिले जातात. जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंना दहावी, बारावी इयत्तेत २५ ग्रेस गुण देण्यात येतात. याकरिता जिल्हा स्तरासाठी पाच गुण, विभागाकरिता १० गुण आणि राज्य स्तरासाठी १५, राष्ट्रीय स्तरावर २० गुण देण्यात येतात. ग्रेस गुणासाठी पात्र खेळाडूंचे प्रस्ताव क्रीडा विभागामार्फत बोर्डाकडे पाठवण्यात येतात. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ग्रेस गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली. तरी देखील जिल्हाबंदी आणि करोनामुळे अनेक खेळाडूंचे प्रस्ताव वेळेत दाखल झाले नाहीत. दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांची एक दोन गुणासाठी दांडी उडाली. पात्र असूनदेखील ग्रेस गुण मिळाले नसल्याची चूक पालकांच्या लक्षात आली. यानंतर पालकांनी शाळा आणि क्रीडा विभागाचे दरवाजे ठोठावले. मात्र, मुदत संपल्याने प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी क्रीडा विभागाने नकार दिला. राज्यातील असे तब्बल ३६८ खेळाडू ग्रेस गुणांपासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आल्यामुळे वंचित विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने या पात्र खेळाडूंचे प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी क्रीडा विभागाला आदेश दिले होते.

वाचा-

यानुसार पालक आणि शाळांनी धावपळ करून प्रस्ताव दाखल केले आहेत. परंतु दीड महिना उलटून गेला तरी या प्रस्तावांवर कार्यवाही झालेली नाही. दाखल केलेल्या प्रस्तावांचे नेमके काय होणार या काळजीने पालक आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहेत. अद्याप काही पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी या ग्रेस गुणांकडे डोळे लावून बसले आहेत.

राज्यातून ग्रेस गुणापासून वंचित राहिलेल्या खेळाडूंचे दाखल केलेले सर्व प्रलंबित प्रस्ताव अद्ययावत करून सरकारकडून सादर करण्यात आले असल्याचे क्रीडासंचालक पुणे यांच्या कार्यालयातून सांगण्यात येत आहे. मात्र, याची पुढील अंमलबजावणी कधी होणार, याबाबत अधिकृत उत्तर मिळत नाही.

मुलांना खेळाडू बनवण्यासाठी अनेक पालक स्वताःच्या पोटाला चिमटा काढून दिवसरात्र कष्ट करतात. प्रशिक्षक आहोरात्र राबतात. कष्टाचे, मेहनतीचे फळ मिळताना शालेय प्रशासन व शिक्षकांच्या गलथानपणाचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी सहानुभूतीपुर्वक विचार करून खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे ग्रेस गुण देऊन उतीर्ण करावे. -अशोक जाधव, पालक, शिराळा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here