नवी दिल्ली: आयपीएल च्या १३व्या हंगामात काल (शुक्रवारी) कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करणाऱ्या दिनेश कार्तिकने ( ) कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर () याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. या घटनेवर भारताच्या माजी खेळाडूने खळबजनक वक्तव्य केले आहे.

दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघाने ७ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला होता आणि ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर होते. कोलकाता संघाची कामगिरी तशी खराब नव्हती. पण अचानक कार्तिक कर्णधारपदावरून पायउतार झाल्याने सर्वांना धक्का बसला. कार्तिकने स्पर्धा सुरू असताना राजीनामा दिल्याने भारताचा माजी जलद गोलंदाज इरफान पठाण आणि माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी काळजी व्यक्त केली.

वाचा-

गुणतक्त्यात अव्वल चार संघात समावेश होता. तरी कार्तिकवर दबाव होता. फलंदाजीच्या क्रमाबद्दल कार्तिकने घेतलेल्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

वाचा-

कोलकाता संघाने हंगामाच्या मध्येच कर्णधाराला हटवले आहे. अर्थात यावर अधिकृतपणे हटवण्यात आले असे म्हटले नाही. असे नेहमीच होते ज्यात म्हटले जाते की संबंधित खेळाडूला कर्णधारपदावर राहण्याची इच्छा नाही, असे आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हटले.

कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघ चांगली कामगिरी करत होता. ते प्लेऑफसाठीचे प्रबळ दावेदार होते. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना सात पैकी फक्त चार सामने जिंकण्याची गरज होती.

वाचा-

KKRने मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार बदलला. पण या निर्णयाचा त्यांना फायदा झाल्याचे दिसले नाही. मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्यांना फक्त १४८ धावा करता आल्या. बदल्यात मुंबईने विजयाचे लक्ष ३ ओव्हर शिल्लक ठेवून पार केले. पराभवानंतर मॉर्गनने संघातील वरिष्ठ फलंदाजांना अधिक जबाबदारी घेण्याचा सल्ला दिला.

पठाण देखील बोलला

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here