दुबई: RR vs RCB आयपीएलच्या १३व्या हंगामातील आज झालेल्या पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सवर ( vs ) धमाकेदार विजय मिळवला. बेंगळुरूच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो होय. त्याने अवघ्या २२ चेंडूत ५५ धावांची स्फोट खेळी करून पराभव होणाऱ्या सामन्यात विजय मिळून दिला.

वाचा-

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने बेन स्टोक्ससोबत सलामीला रॉबिन उथप्पाला पाठवले. स्टोक्स १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला तो ९ धावा करून बाद झाला. दोन बाद ६९ अशी अवस्था असताना कर्णधार स्मिथ आणि उथप्पा यांनी अर्धशतकी भागिदारी केली. उथप्पा ४१ धावांवर बाद झाला. त्यानंतर जोस बटलर २४ धावांवर माघारी परतला. पण दुसऱ्या बाजूला कर्णधार स्टीव्ह स्मिथने किल्ला लढवला. त्याने ३६ चेंडूत ५७ धावा केल्या. राजस्थानने २० षटकात ६ हाद १७७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.

वाचा-

विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या बेंगळुरूची सुरूवात फार चांगली झाली नाही. फिंच १४ धावा करून माघारी परतला. त्यानंतर विराट आणि देवदत्त पडिक्कल यांनी विजयाचा पाया रचून दिला. त्यांनी ७९ धावांची भागिदारी केली. हे दोघे विजय मिळून देतील असे वाटत असताना देवदत्त ३५ धावांवर बाद झाला आणि त्यापाठोपाठ विराट कोहली देखील ४३ धावा करून माघारी परतला. सीमारेषेवर राहुल तेवतियाने विराटचा शानदार कॅच घेतला. १ बाद १०१ वरून बेंगळुरूची अवस्था ३ बाद १०२ अशी झाली.

वाचा-

राजस्थानच्या गोलंदाजांनी वचर्स्व मिळवण्याचा प्रयत्न केला. पण एबी डिव्हिलियर्सने त्यांना जुमानले नाही. त्याला सुरेख साथ दिली ती गुरकिरत सिंग मान याने. एबीने २२ चेंडूत ६ षटकार आणि फक्त १ चौकार मारत नाबाद ५५ धावा केल्या. तर गुरकिरतने १७ चेंडूत १९ धावा केल्या.

वाचा-

या विजयासह बेंगळुरूने गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ९ सामन्यातील ६ विजयांसह त्यांचे १२ गुण झाले आहेत. तर या पराभवाने राजस्थानच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ९ सामन्यात त्यांना फक्त ३ मध्ये विजय मिळवता आला आहे. गुणतक्त्यात ते सातव्या स्थानावर आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here