शारजा: सध्याच्या घडीला जगामध्ये करोनाचे संकट आहे. पण करोना असतानाही आयपीएल सुरु झालेले सर्वांनीच पाहिले आहे. भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे एक मजेशिर ट्विट सध्याच्या घडीला चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. आयपीएलमधला एक खेळाडू करोनावरील औषधंही बनवू शकतो, असे ट्विट सेहवागने केले असून ते चांगलेच व्हायरल झालेले आहे.

आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यामध्ये सामना झाला. हा सामना आरसीबीने सात विकेट्स राखून जिंकला. पण या सामन्यात राजस्थानचा एक युवा खेळाडू चांगली कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये त्याने चांगलेच नाव कमावले आहे. त्यामुळे तोच करोनावरील औषधही बनवू शकतो, असे सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आता हा खेळाडू कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा युवा खेळाडू आहे राहुल तेवातिया.

सेहवागने यावेळी राहुल तेवितियाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर सेहवागने एक कमेंटही केली आहे. या ट्विटमध्ये सेहवागने सांगितले आहे की, ” तेवातिया हा काहीही करू शकतो. जर करोनावरील औषध बनवण्याची संधी मिळाली तर सध्याच्या घडीला त्याचा जो टायमिंग सुरु आहे, ते पाहता तो हेदेखील काम करू शकतो. सध्याच्या घडीला तेवातिया हा भन्नाट फॉर्मात आहे.”

सेहवाने काही मिनिटांपूर्वीच हे ट्विट केले आहे. या ट्विटला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले आहे. त्यामुळे आता हे ट्विट तेवातियापर्यंत पोहोचणार का आणि पोहोचल्यावर तो सेहवागला नेमकं काय उत्तर देतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आयपीएलच्या १३व्या हंगामातील आज झालेल्या पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore) धमाकेदार विजय मिळवला. बेंगळुरूच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो एबी डिव्हिलियर्स होय. त्याने अवघ्या २२ चेंडूत ५५ धावांची स्फोट खेळी करून पराभव होणाऱ्या सामन्यात विजय मिळून दिला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here