मुंबई: भारतीय नियामक मंडळाने गुरुवारी वार्षिक करार जाहीर केले. या करारात कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा सर्वाधिक ७ कोटी मानधनाच्या ए प्लस ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला. पण सर्वाधिक चर्चा झाली ती टीम इंडियाचा माजी कर्णधार याच्या नावाची. बीसीसीआयने करारातून धोनीला वगळले आणि चर्चाना सुरूवात झाली.

बीसीसीआयने करारातून धोनीला वगळल्यामुळे त्याला निवृत्तीसंदर्भात इशारा दिला आहे, अशी चर्चा सुरू झाली. भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीला करारातून वगळले याचा अर्थ पुन्हा भारताकडून खेळणार नाही, असे ही बोलले जाऊ लागले.

वाचा-

धोनी भारताकडून अखेरची कसोटी डिसेंबर २०१४मध्ये, टी-२० फेब्रुवारी २०१९मध्ये तर अखेरची वनडे जुलै २०१९मध्ये खेळला आहे. धोनीला करारातून वगळण्या आले याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

बीसीसीआयच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूसोबत करार करायचा असेल तर त्याने किमान गेल्या सहा महिन्यात भारताकडून सामना खेळणे अपेक्षित आहे. त्यामुळेच धोनीचा करारात समावेश केला नाही. याचा अर्थ बीसीसीआयकडून त्याला निरोपाचा इशारा दिला आहे असे होत नाही.

धोनीच्या भविष्यातील योजनेबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही. त्याच्या सोबत करार केला नाही याचा अर्थ त्याची निवड पुन्हा होणार नाही, असे नसल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.

धोनी वर्ल्ड कप खेळणार

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार धोनी आयपीएलनंतर निवृत्ती घेणार नाही. तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी उपलब्ध असेल. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून धोनीने शानदार कामगिरी केली तर तो नक्कीच भारतीय संघासाठी उपलब्ध असेल.

ग्रेड आणि त्यामधील खेळाडू…

‘ग्रेड ए प्लस’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. ‘ए ग्रेड’मध्ये आर.अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रेड बी’ मध्ये वृद्धीमान सहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयांक अग्रवाल हे खेळाडू आहेत. तिसऱ्या म्हणजेच ‘ग्रेड सी’मध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पंड्या, हनुमान विहारी, शादुर ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here