दुबई: आयपीएल २०२० मध्ये आज होणाऱ्या डबल हेडरमधील दुसरी लढत विरुद्ध यांच्यात होणार आहे. मुंबई संघा सध्या शानदार फॉर्ममध्ये असून त्यांनी सलग ५ लढती जिंकल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला ख्रिस गेल संघात आल्याने पंजाब संघात उत्साह आला आहे.

गुणतक्त्यावर नजर टाकल्यास मुंबई संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आज विजय मिळवला तर ते पहिल्या स्थानावर जातील. या उटल पंजाब संघ अखेरच्या स्थानावर असून एक पराभव जरी झाला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील. आतापर्यंत त्यांनी ८ पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे.

या दोन्ही संघात आतापर्यंत २५ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १४ मुंबईे तर ११ पंजाबने जिंकल्या आहेत. या वर्षा झालेल्या लढतीत मुंबईने ४८ धावांनी विजय मिळवला होता. मुंबईची दमदार फलंदाजी आणि घातक गोलंदाजी या सूत्रापुढे विरोधी संघांना काहीच करता आलेले नाही. गेल्या सामन्यात त्यांनी कोलकाताचा ८ विकेटनी पराभव केला होता.

मुंबईचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माने २५१ धावा केल्या आहेत. तर क्विंट डीकॉकने २६९ धावा केल्या आहेत. त्यानंतर सुर्यकुमार यादव (२४३), इशान किशन (१८६) यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्याकडे आयपीएलमधील सर्वात यशस्वी जोडी म्हणून पाहिले जाते. त्यांनी ८ सामन्यात प्रत्येकी १२ विकेट घेतल्या आहेत. तर फिरकीपटूने राहुल चाहरने देखील उपयोगीता सिद्ध केली आहे.

दुसरीकडे पंजाबकडून कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी यावर्षी सर्वाधिक धावा केल्या आहेत. या दोन्ही सलामीवीरांनी चांगली कामगिरी करून देखील पंजाब मात्र सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. गेल्या सामन्यात ख्रिस गेल प्रथम मैदानात उतरला होता. त्याने धमाकेदार अर्धशतकी खेळी केली होती.

प्ले ऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर पंजाबला यापुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here