अबुधाबी : सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आजच्या सामन्यात एक विक्रम रचल्याचे पाहायला मिळत आहे. कारण हा विक्रम रचताना वॉर्नरने विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळत आहे.

केकेआरविरुद्धच्या सामन्यात वॉर्नरने आयपीएलमधील पाच हजार धावांचा पल्ला पूर्ण केला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये पाच हजार धावा करणारा तो पहिला परदेशी खेळाडू असल्याचे पाहायला मिळत आहे. पण त्याचबरोबर या पाच हजार धावा करताना वॉर्नरने कोहली आणि रोहित यांना पिछाडीवर टाकले आहे.

वॉर्नरने या पाच हजार धावा १३५ सामन्यांमध्ये केलेल्या आहेत. आतापर्यंत सर्वात जलद आयपीएलमधील पाच हजार धावा या वॉर्नरच्या नावावर जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण विराटने जेव्हा पाच हजार धावा पूर्ण केल्या तेव्हा त्याच्या नावावर १५७ सामने होते. त्याचबरोबर रोहितने जेव्हा पाच हजार धावा केल्या तेव्हा त्याच्या नावावर १८७ सामने होते. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वात जलद पाच हजार धावा करण्याचा विक्रम वॉर्नरच्या नावावर झालेला आहे.

केकेआरविरुद्धचा सामना हैदराबादचा संघ गमावणार, असे चित्र कुठेतरी दिसत होते. कारण त्यांच्या फलंदजांना यावेळी चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण वॉर्नरने ३३ चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर नाबाद ४८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. यावर्षीच्या आयपीएलमध्ये हा तिसरा सामना आहे, जो सुपर ओव्हरमध्ये गेला आहे. यापूर्वी सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी या दोन्ही संघांनी विजय मिळवल्याचे आपण सर्वांनीच पाहिलेले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here