अबुधाबी: आयपीएलमधील आजची लढत खऱ्या अर्थाने सुपर संडे ठरली. कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad vs ) यांच्यात झालेली लढत सुपर ओव्हरमध्ये गेली. दोन्हीसंघांनी २० षटकात समान म्हणजे १६३ धावा केल्या. त्यानंतर हैदराबादने सुपर ओव्हरमध्ये फक्त दोन धावा केल्या. त्यामुळे KKRला विजयासाठी ३ धावांची गरज होती. कोलकाताकडून दिनेश कार्तिक आणि कर्णधार इयोन मॉर्गन यांनी सुपर ओव्हरमध्ये विजय मिळून दिला. यावर्षाच्या आयपीएलमधील ही तिसरी सुपर ओव्हरची मॅच ठरली.

वाचा-

अशी झाली सुपर ओव्हर

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने संघर्ष करत ५ बाद १६३ ही धावसंख्या उभी केली. KKRकडून शुभमन गिलने सर्वाधिक ३६ त्या पाठोपाठ कर्णधार मॉर्गनने ३४ तर कार्तिकने नाबाद २९ धावा केल्या. विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादला जॉनी बेयरस्टो आणि केन विलियमसन यांनी चांगली सुरूवात करून दिली. पण त्यानंतर त्याचा डाव कोसळला. पण कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अखेरपर्यंत लढा दिला त्याने नाबाद ४७ धावा केल्या. १९ षटकात हैदराबादने १४६ धावा केल्या होत्या. अखेरच्या ६ चेंडूत त्यांना १८ धावा हव्या होत्या. पण आंद्रे रसेलने १७ धावाच दिल्या. अखेरच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना वॉर्नरला एकच धाव घेता आली आणि सामना टाय झाला.

वाचा-

सुपर ओव्हरमध्ये कोलकाताकडून लॉकी फर्ग्युसनने पहिल्याच चेंडूवर वॉर्नरची विकेट घेतली. दुसऱ्या चेंडूवर दोन धावा झाल्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने पुन्हा विकेट घेतली आणि हैदराबादचा डाव संपुष्ठात आणला.

वाचा-

कोलकाताला विजयासाठी फक्त ३ धावा हव्या होत्या. हैदराबादकडून राशिद खानने अखेरची सुपर ओव्हर टाकली. तर फलंदाजीला कर्णधार मॉर्गन आणि दिनेश कार्तिक होता. राशिदने पहिल्या चेंडूवर धाव दिली नाही. दुसऱ्या चेंडूवर मॉर्गनने एक धाव काढून दिली. तिसरा चेंडू पुन्हा वाया गेला. अखेर चौथ्या चेंडूवर कार्तिकला दोन धावा मिळाल्या आणि कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

वाचा-

कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो लॉकी फर्ग्युसन. त्याने आधी ४ षठकात १५ धावा देत ३ विकेट घेतल्या आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये २ धावा आणि दोन विकेट घेत. विजय सोपा करून दिला.

वाचा-

या विजयामुळे कोलकाताने गुणतक्त्यातील चौथे स्थान कायम राखले आहे. त्यांनी ९ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे तर हैदराबाद ९ पैकी ३ विजयासह पाचव्या स्थानावर आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here