दुबई: IPL2020 आयपीएलमध्ये काल रविवार खऱ्या अर्थाने सुपर संडे ठरला. डबर डेडर असलेल्या दिवशी प्रथम सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि () यांच्यातील लढत देखील सुपर ओव्हरमध्ये गेली. पहिल्या सामन्यात कोलकाताने तर दुसऱ्या सामन्यात पंजाबने बाजी मारली या विजयानंतर गुणतक्त्यात (IPL 2020 ) मोठा बदल झाला आहे.

वाचा-

पंजाबने पहिल्या ७ लढतीपैकी ६ गमावल्या होत्या. त्यामुळे पुढील सर्व लढतींमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यांनी आठव्या लढतीत बेंगळुरूचा पराभव केला. त्यानंतर काल सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा पराभव केला. यामुळे गुणतक्त्यात ते गेल्या काही दिवसांपासून आठव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावर गेले आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांना मागे टाकले. चेन्नई सातव्या तर राजस्थान आठव्या स्थानावर आहे.

वाचा-

कालच्या सामन्यात जर मुंबईने विजय मिळवला असता तर ते पहिल्या क्रमांकावर गेले असते. पण आता मुंबईच्या खात्यात ९ पैकी ६ विजयासह १० गुण आहेत. ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रविवारी झालेल्या पहिल्या कोलकाताने हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत. गुणतक्त्यातील चौथे स्थान कायम राखले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here