दुबई: रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आयपीएलमधील आजवरचा थरारक सामना झाला. ( ) आणि किंग्ज इलेव्हन () यांच्यात ४० षटकाचा खेळ झाल्यानंतर देखील निकाल लागला नाही. त्यामुळे विजेता सुपर ओव्हरमध्ये ठरवला गेला. पण ही नेहमी सारखी नव्हती. सुपर ओव्हर देखील टाय झाली. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एक सामन्यात दुसरा सुपर ओव्हर खेळला गेला. या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला.

गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. तेव्हा देखील सुपर ओव्हरमध्ये सामना टाय झाला. पण नियमानुसार सर्वाधिक चौकार मारलेल्या संघाला विजयी घोषीत करण्यात आले. या नियमामुळे इंग्लंड विजेते झाले. या नियमावर नंतर फार वाद झाला होता. त्यामुळे आयसीसीने नियम बदलला. नव्या नियमानुसार सुपर ओव्हर टाय झाला तर पुन्हा सुपर ओव्हर खेळवली जाईल. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर होईल.

वाचा-

काल आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात जर जुना नियम असता तर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला असता. स्पर्धेचे चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या रोहित शर्माच्या मुंबई संघाने एकूण २४ चौकार (१५ चौकार, ९ षटकार) मारले होते. तर पंजाबने २२ (१४ चौकार, ८ षटकार) मारले. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी पहिल्या सुपर ओव्हरमध्ये एकही चौकार मारला नाही.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या. किंग्ज इलेव्हन पंजाबने देखील तितक्याच धावा केल्या. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहविरुद्ध किंग्जने ५ धावा केल्या. तर मोहम्मद शमीने देखील मुंबईच्या रोहित शर्मा आणि डॉकॉक यांना ५ धावा करू दिल्या. सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर मुंबईने ११ धावा केल्या. तर पंजाबने १५ धावा करत विजय मिळवला.

या सामन्यात जर जुना चौकरांचा नियम असता तर मुंबईला विजय मिळवता आला असता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here