याआधीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईचा पराभव केला होता. तर राजस्थानला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने पराभव केला होता. बेंगळुरूविरुद्ध राजस्थान विजयाच्या जवळ पोहोचला होता. पण १९व्या षटकात एबी डिव्हिलियर्सने स्फोटक फलंदाजी केली.
वाचा-
राजस्थानसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे, सलामीची जोडी होय. बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पा यांनी सुरुवात चांगली करून दिली आहे. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने देखील अर्धशतक झळकावले. फलंदाजीत हा संघ मोठी धावसंख्या उभी करू शकतो. पण विजय मिळवण्यासाठी संजू सॅमसन आणि बेन स्टोक्स यांनी अधिक धावा करण्याची गरज आहे. जोस बटलर उत्तम फिनिशरची भूमिका पार पाडू शकतो. त्याच बरोबर राहुल तेवतिया आणि जोफ्रा आर्चर देखील मोठे शॉट्स खेळतात.
वाचा-
गोलंदाजीत जोफ्रा आणि कार्तिक त्यागी प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकतात. तेवतिया आणि श्रेयस गोपाल यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. जयदेव उनाडकटने गेल्या सामन्यात खराब गोलंदाजी केली त्याला संघात स्थान मिळते का हे पाहावे लागले.
वाचा-
चेन्नईचा विचार करायचा झाल्यास फलंदाजांची कामगिरी सातत्यापूर्ण नाही. गेल्या सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये सॅम करन बाद झाला. त्यानंतर शेन वॉट्सन आणि फाफ डुप्लेसिस आणि अंबाती रायडू यांनी मोर्चा सांभाळला. अखेरच्या षटकात रविंद्र जडेजाने तुफानी खेळी केली. धोनीचा फॉर्म हा अद्याप चिंतेचा विषय आहे. तो अद्याप फलंदाजीत कमाल करू शकला नाही. आता राजस्थानविरुद्ध चेन्नईचे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहावे लागले. गोलंदाजीत सॅम करन यशस्वी ठरतोय. दिल्लीविरुद्ध १९व्या षटकात त्याने चेन्नईसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. पण ड्वेन ब्राव्हो जखमी झाल्याने जडेजाला अखेरची ओव्हर टाकावी लागली.
वाचा-
कोच फ्लेमिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्राव्हो काही दिवस सामने खेळू शकणार नाही. त्याच्या ऐवजी जोश हेडलवुडला संधी दिली जाऊ शकते. दिपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांनी जवळ जवळ प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात करून दिली आहे. कर्ण शर्मा अद्याप प्रभाव टाकू शकला नाही. त्यामुळे आज कदाचीत पियुष चावलाला संधी दिली जाऊ शकते.
संभाव्य संघ
चेन्नई- सॅम करन, फाफ डुप्लेसिस, शेन वॉट्सन, अंबाती रायडू, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रविंद्र जडेजा, केदार जाधव, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा, लुंगी नगिडी
राजस्थान- रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर (विकेटकिपर), रियान पराग, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, वरून आरोन, कार्तिक त्यागी
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times