नवी दिल्ली: मुंबई इंडियन्स विरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा () कर्णधार ( ) ने ७७ धावांची खेळी केली. आयपीएलमधील हे त्याचे २१वे अर्धशतक ठरले. त्याने ५१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७७ धावा केल्या. याच बरोबर आयपीएलमध्ये २ हजार ५०० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो २३वा खेळाडू तर १७वा भारतीय खेळाडू आहे.

वाचा-

मुंबई आणि पंजाबमधील ही लढत दोन सुपर ओव्हरमुळे जरी चर्चेत आली असली तरी या सामन्यात केएल राहुलने अशी कामगिरी केली जी आजपर्यंत अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आली नाही.

वाचा-

सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या राहुलने सलग ३ स्पर्धेत ५००हून अधिक धावा केल्या आहेत. राहुने २०१८ साली ६५९, २०१९ मध्ये ५९३ धावा केल्या होत्या. या वर्षी त्याने आतापर्यंत ५२५ धावा केल्या आहेत. या वर्षी सर्वाधिक धावा आतापर्यंत त्याच्या नावावर आहेत. याआधी भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, सुरेश रैना आणि सचिन तेंडुलकर यांनी सलग दोन हंगामात ५००हून अधिक धावा केल्या आहेत. विराटने २०१३ आणि २०१४ तर सचिनने २०१० आणि २०११ मध्ये अशी कामगिरी केली होती. रैनाने २०१३ आणि २०१४ मध्ये ५००हून अधिक धावा केल्या आहेत. पण सलग ३ स्पर्धेत अशी कामगिरी फक्त राहुलला करता आली आहे. या हंगामात त्याने ५ अर्धशतक केली आहेत. हंगामात सर्वाधिक अर्धशतक त्यानेच केली आहेत.

वाचा-

आयपीएलच्या इतिहासात सलग ५०० हून अधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने २०१४ ते २०१७ अशा चार हंगामात ५००हून अधिक धावा केल्या आहेत. ख्रिस गेलने २०११ ते २०१३ या सगल ३ हंगामात अशी कामगिरी केली आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here