दुबई: निर्धारीत ५० किंवा २० षटकात दोन्ही संघ जेव्हा समान धावा करतात तेव्हा सामना सुपर ओव्हर () मध्ये जातो. सामना टाय आणि सुपर ओव्हर हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकल आहे. पण सुपर ओव्हर टाय आणि आणखी एक सुपर ओव्हर असे वाक्य क्रिकेटच्या इतिहासात फक्त एकदा ऐकायला मिळाले. आयपीएल () मध्ये काल रविवारी आणि यांच्यातील लढत सुपर ओव्हरमध्ये झाली. पण सुपर ओव्हर देखील टाय झाल्याने दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

वाचा-

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारली. पण या काळात जेव्हा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये काही गोंधळ पाहायला मिळाले. दुसऱ्यांदा सुपर ओव्हर होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नियम काय आहेत याबद्दल खेळाडूंच्या मनात देखील काही शंका होत्या. जाणून घेऊयात आयसीसीचे काय नियम आहेत.

वाचा-

नियम
१) ICCच्या नव्या नियमानुसार जर सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला नाही तर जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवल्या जातील.

२) सामान्य परिस्थितीत एका सुपर ओव्हरनंतर दुसरा सुपर ओव्हर सुरू होण्यास ५ मिनिटापेक्षा अधिक मोठा ब्रेक असता कामा नये

३) गेल्या सुपर ओव्हरमध्ये ज्या संघाने फलंदाजी केली असेल तोच संघ पुढील सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करले

४) ज्या चेंडूने आधीच्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती त्याच चेंडूने पुढील सुपर ओव्हर टाकली जाईल.

५) क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने ज्या बाजूने ओव्हर टाकली होती त्याच बाजूने तो पुढील सुपर ओव्हर टाकू शकत नाही. त्यांना दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करावी लागते

६) गेल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेला फलंदाज पुढील सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी येऊ शकत नाही

७) ज्या गोलंदाजाने आधीची सुपर ओव्हर टाकली असेल तोच पुन्हा पुढील सुपर ओव्हर टाकू शकत नाही.

८) मैदानावरील खेळ परिस्थिती तशीच असेल जशी आधीच्या सुपर ओव्हरमध्ये होती

९) काही कारणामुळे जर अमर्यादित सुपर ओव्हर टाकता येत नसतली तर संबंधित बोर्डाने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना सुपर ओव्हर किती टाकता येतील याची कल्पना द्यावी

वाचा-

काय झाले होते मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यात
मुंबईने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या. किंग्ज इलेव्हन पंजाबने देखील तितक्याच धावा केल्या. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहविरुद्ध किंग्जने ५ धावा केल्या. तर मोहम्मद शमीने देखील मुंबईच्या रोहित शर्मा आणि डॉकॉक यांना ५ धावा करू दिल्या. सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर मुंबईने ११ धावा केल्या. तर पंजाबने १५ धावा करत विजय मिळवला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here