राजकोट: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाने विकेटकीपर म्हणून आंध्र प्रदेशच्या के.एस भरत याचा संघात समावेश केला आहे. मुंबईत झालेल्या पहिल्या वनडेत ऋषभ पंतला दुखापत झाली होती. पंतवर सध्या डॉक्टरांच्या देखरेोखीखाली उपचार सुरु आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना पंतला दुखापत झाली होती. पंतच्या ऐवजी त्या सामन्यात केएल राहुल याने युष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. आता दुसऱ्या वनडेसाठी भरतला संधी देण्यात आली आहे.

वाचा-

प्रथम श्रेणी सामन्यात भरतने चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये देखील त्याने सातत्य ठेवले आहे. भरतने ७४ प्रथम श्रेणी सामन्यात ४ हजार १४३ धावा केल्या असून त्यात ९ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीमध्ये त्याच्या नावावर एका त्रिशतकाची देखील नोंद आहे. यष्टीरक्षण करताना त्याने ५४ झेल, तर ११ विकेट घेतल्या आहेत.

यजमान भारतावर मालिका वाचविण्याचे दडपण

मालिकेतील पहिल्या वन-डे
सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारतावर मिळविलेल्या एकतर्फी विजयानंतर मालिकेतील दुसऱ्या वन-डे सामन्यात मालिका वाचविण्याचे दडपण विराट कोहलीच्या भारतीय संघावर असणार आहे.

पहिल्या वन-डेत कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. तो अवघ्या १६ धावांवर माघारी परतला. त्यामुळे महत्त्वाच्या राजकोट वन-डेत कोहली पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस यावे लागू शकते. विशेष म्हणजे लोकेश राहुल आणि शिखर धवन या दोघांनीही आपल्याला कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल, असे म्हटले आहे. मागील लढतीत धवनने ९१ चेंडूंत ७४, तर लोकेश राहुलने ६१ चेंडूंत ४७ धावा केल्या होत्या. त्यामुळे यांचे संघातील स्थान निश्चित राहणार असून, फलंदाजीचा क्रम मात्र बदलणार आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरमध्ये स्पर्धा असेल.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here