अबुधाबी, : महेंद्रसिंग धोनीसारखा कोणी नाही, हे आजच्या सामन्यात पुन्हा एकदा पाहायला मिळाले. कारण धोनीच्या एका निर्णयामुळे पंचांनी एक मोठा निर्णय बदलल्याचे आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. आपल्या आयपीएलमधीव विक्रम सामन्यातही धोनीने ही किमया करून दाखवली.

चेन्नी सुपर किंग्स आणि राज्थान रॉयल्स या आज सुरु असलेल्या सामन्यात धोनीची एक गोष्ट पाहायला मिळाली. धोनी हा किती चतुर खेळाडू आहे आणि त्याचे निर्णय किती योग्य असतात हे आजच्या सामन्यातही पाहायला मिळाले. आतापर्यंत बऱ्याच कर्णधारांना डीआरएस योग्यपद्धतीने घेता येत नसल्याचे आपण पाहिले आहे. पण धोनीने आजच्या सामन्यात डीआरएस घेऊन अंबाती रायुडूची विकेट वाचवल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट घडली ती नवव्या षटकात. हे षटक राजस्थानचा श्रेयस गोपाल टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सॅम करन आऊट झाला आणि धोनी नुकताच फलंदाजीला आला होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर श्रेयसने पायचीतची अपील केली. त्यावेळी अंबाती रायुडू हा फलंदाजी करत होता आणि रायुडूच्या पॅडला चेंडू लागला होता. त्यावेळी पंचांनी रायुडूला आऊट दिले होते.

रायुडूला पंचांनी आऊट दिले. त्यानंतर रायुडू धोनीकडे आला आणि डीआरएस घ्यायचा की नाही, हे त्याला विचारले. धोनीने यावेळी रायुडूला काही गोष्टी विचारल्या आणि त्याने डीआरएस घेण्यास सांगितले. त्यावेळी डीआरएसमध्ये चेंडू स्टम्पच्या लाईनमध्ये नव्हता, हे पाहायला मिळाले. त्याचबरोबर चेंडू स्टम्पला लागत नसल्याचेही स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांना रायुडूला नाबाद ठरवले आणि डीआरएस म्हणजे धोनी रीव्ह्यू सिस्टिम का आहे, याचा पुन्हा एकदा चाहत्यांना प्रत्यय आला. पण या जीवदानाचा फायदा रायुडूला चांगला उचलता आला नसल्याचेच पाहायला मिळआले. कारण त्यानंतर रायुडू हा लवकरच बाद झाला. यावेळी रायुडूला फक्त १३ धावा करता आल्या. पण धोनीचा निर्णय किती योग्य असतो, हे पुन्हा एकदा क्रिकेट विश्वाला डीआरएसच्या माध्यमातून समजता आले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here