अबुधाबी, : राजस्थान रॉयल्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सवर सात विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. चेन्नईवर मोठा विजय मिळाल्यामुळे राजस्थानचा गुणतालिकेत चांगलीच बढती मिळाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यातील विजयामुळे गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ नऊ सामने खेळला होता. या नऊ सामन्यांमध्ये राजस्थानला फक्त तीन विजय मिळवता आले होते, तर त्यांना सहा पराभव स्वीकारावे लागले होते. पण आजच्या दहाव्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने दोन गुणांची कमाई केली आहे. या दोन गुणांसह राजस्थानचा संघ आठव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या सामन्यातील विजयानंतर राजस्थानचे आठ गुण झाले आहेत आणि त्यांनी थेट पाचव्या स्थानावर भरारी घेतली आहे.

चेन्नईच्या संघाला आजच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. हा पराभव नक्कीच चेन्नईच्या जिव्हारी लागणारा आहे. कारण या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ सातव्या स्थानावर होता. या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ नऊ सामने खेळला होता. या नऊ सामन्यांमध्ये चेन्नईला फक्त तीन विजय मिळवता आले होते, तर त्यांना सहा पराभव स्वीकारावे लागले होते. पण आजच्या दहाव्या सामन्यात चेन्नईला सातवा पराभवही पत्करावा लागला. त्यामुळे गुणतालिकेत चेन्नईच्या संघाची सातव्यावरून आठव्या स्थानावर घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

गुणतालिकेत अव्वल स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ १४ गुणांसह आहे, तर दुसरे स्थान हे मुंबई इंडियन्सने पटकावले आहे. मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या दोन्ही संघांचे समान १२ गुण आहेत, पण कमी रनरेटमुळे आरसीबीच्या संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. गुणतालिकेतील चौथे स्थान हे केकेआरच्या संघाने पटकावले आहे.

चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयस्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची ३ बाद २८ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर राजस्थानच्या जोस बटलरने अर्धशतक साकारले आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानला चेन्नईवर दमदार विजय मिळवता आला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here