केपटाऊन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी वनडे राजकोट येथे सुरु आहे. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेत आयसीसीचा १९ वर्षाखालील वर्ल्ड कप (ICC ) सुरू होत आहे. भारताच्या १९ वर्षाखालील संघाने आतापर्यंत चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. तर दोन वेळा उपविजेतेपद मिळवले आहे.

स्पर्धेचे टीम इंडियाने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ असे चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेत भारताची विजयाची सरासरी देखील सर्वाधिक म्हणजे ७६.३१ इतकी आहे. भारतीय संघाचे नेतृत्व प्रियम गर्गकडे असून त्याच्याकडून मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ यांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आहे.

वाचा-

स्पर्धेतील १६ संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून भारतीय संघाचा समावेश ए ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, श्रीलंका आणि जपानचा संघ आहे. जपान प्रथमच या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. प्रत्येक ग्रुपमधून दोन संघ सुपर लीग स्टेजला पात्र ठरतील. अंतिम सामना ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

आयसीसीच्या या स्पर्धेतूनच भारतीय संघाला विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग (स्पर्धा १९९८), युवराज सिंग (२०००), शिखर धवन (२००४), रोहित शर्मा (२००६), रविंद्र जडेजा (२००६ आणि २००८) हे क्रिकेटपटू मिळाले आहेत.

वाचा-

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा विचार केल्यास ब्रायन लारा, इंझमाम-उल-हक, सनथ जयसूर्या, मायकल क्लार्क, ब्रॅडन मॅकलम, बाबर अजम, ख्रिस गेल या खेळाडूंनी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेतूनच स्वत:ची ओळख निर्माण केली होती.

भारतीय संघाचा पहिला सामना १९ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध आहे. दुसरा सामना २१ जानेवारी रोजी जपान तर तिसरा सामना २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here