नवी दिल्ली: भारताचा माजी स्फोटक फलंदाज आज ४२वा वाढदिवस (Happy Birthday ) साजरा करत आहे. २० ऑक्टोबर १९७८ साली जन्मलेल्या सेहवागने फलंदाजांची झोप उडवली होती आणि क्रिकेटचे स्वरुप बदलले होते.

वाचा-

२००१ साली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत होता. भारताची अवस्था ४ बाद ६९ अशी झाली होती. सचिन तेंडुलकर सोबत मैदानात उतरला एक २३ वर्षाचा युवा खेळाडू. विरेंद्र सेहवागची ती पहिली मॅच होती. आफ्रिकेविरुद्धच्या त्या कसोटी सामन्यात वेगवान आणि उसळी घेणाऱ्या पिचवर शॉन पॉलक आणि मखाय टिनी सारखे गोलंदाज होते. पण सेहवागने चोख उत्तर दिले. त्याचा प्रत्येक शॉट हा सचिन तेंडुलकर सारखा होता. १९ चौकारांसह सेहवागने त्या सामन्यात पहिले शतक झळकावले. त्यानंतर सेहवागने एकापाठोपाठ एक विक्रम करण्यास सुरूवात केली. सेहवाग बद्दल बोलताना सौरव गांगुली म्हणाला होता की, आधी सलामीची फलंदाज चेंडू सोडत असत आणि मग तो जुना होत असे. पण सेहवाग चेंडू मारून मारून तो जुना करत असे.

वाचा-

कसोटी क्रिकेटमध्ये १०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. त्याने २००८ साली आफ्रिकेविरुद्ध १०४.९३च्या स्ट्राइक रेटने ३१९ धावा केल्या होत्या. कसोटीत डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर फक्त सेहवागने दोन वेळा त्रिशक झळकावले आहे. ब्रॅडमन यांनी ३३४, ३०४, २९९ नाबाद तर सेहवागने ३१९, ३०९ आणि २९३ अशा धावा केल्या आहेत. या शिवाय सेहवागने एकदा २९० धावा केल्या आहेत.

वाचा-

कसोटीत कमी चेंडूत त्रिशतक करण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. त्याने २७८ चेंडूत ३०० धावा केल्या आहेत. या शिवाय कसोटीत त्रिशतक आणि वनडेत द्विशतक करणारा तो पहिला फलंदाज आहे. अशी कामगिरी ख्रिस गेलने केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान द्विशतकांमधील ५ त्याच्या बॅटमधून आली आहेत.

वाचा-

सेहवागच्या नावावर असा एक विक्रम आहे जो आतापर्यंत कोणालाच मोडता आला नाही. २०११ साली डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात सेहवागने द्विशतक केले. त्याने १४९ चेंडूत २१९ धावा केल्या. यात २५ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. तेव्हा भारताने ४१८ धावा केल्या आणि १५३ धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजविरुद्धचे सेहवागचे हे द्विशतक कर्णधारपदावर असताना झाले होते. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून द्विशतक करणारा ते एकमेव खेळाडू आहे.

विरेंद्र सेहवागने १०४ कसोटी सामन्यात ४९च्या सरासरीने ८ हजार ५८६ तर २५१ वनडेत ८ हजार २७८ धावा केल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here