नवी दिल्ली: आयपीएलचा १३वा हंगाम () साठी सर्वात खराब ठरला आहे. संघातील दोन वरिष्ठ खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी नाव मागे घेतले. त्यानंतर दोन खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाली. मैदानावर देखील संघाचा कामगिरी चांगली झाली नाही.

धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखाली संघाने सुरूवात तरी चांगली केली होती. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पण त्यानंतर चेन्नई एक्स्प्रेस जी रुळावरून घसरली ती अद्याप तशीच आहे. आतापर्यंत १० सामन्यात फक्त तीन विजयासह चेन्नईचा संघ गुणतक्त्यात सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. सोमवारी अबुधाबीत झालेल्या राजस्थान रॉयलस विरुद्धच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. यामुळे चेन्नईसाठई प्लेऑफमध्ये जागा मिळवणे अत्यंत अवघड झाले आहे.

वाचा-

दिल्ली संघ १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यांनी ९ पैकी ७ गुण मिळवले आहेत. तर चेन्नई सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. असे असेल तरी आता देखील ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. पण यात जर तर असे बरेच मुद्दे आहेत. चेन्नईला जर प्ले ऑफमध्ये जायचे असेल तर त्यांना प्रथम शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागले.

चेन्नईचे फक्त ३ सामन्यात विजय मिळवला आहे. अजून त्यांचे ४ सामने शिल्लक आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना चारही सामन्यात विजय मिळवावा लागले. त्याच बरोबर विजयाचे अंतर देखील मोठे ठेवावे लागले. जेणेकरून त्यांचे नेट रनरेट अन्य संघांपेक्षा चांगले होईल.

वाचा-

प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्याही संघाला १६ गुणांची गरज असते. चेन्नईला इतके गुण मिळण्याची शक्यता नाही. चार सामन्यात त्यांना ८ गुण मिळवता येतील आणि त्यानंतर देखील त्यांना नशिबावर अवलंबून रहावे लागले.

जर चेन्नईने १४ सामन्यात मिळून १४ गुण मिळवले तर प्ले ऑफमध्ये जाण्यासाठीची एक आशा आहे. गेल्या वर्षी सनरायजर्स हैदराबादने १२ गुण मिळून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता.

काय आहेत शक्यता

दिल्ली सध्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. त्यांचे पाच सामने शिल्लक आहेत. चेन्नईसाठी दिल्लीने त्या ५ ही सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. जर दिल्लीचा मुंबई विरुद्धच्या सामन्यात पराभव जरी झाला तरी चेन्नईच्या आशा कायम राहतील.

दुसरी अट म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ जो तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी ९ पैकी ६ सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नईला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी बेंगळुरू गुणतक्त्या याच स्थानावर राहणे गरजेचे आहे. बेंगळुरू दुसऱ्या आणि मुंबई तिसऱ्या स्थानावर येऊ शकते. पण बेंगळुरूसाठी कोलकाता आणि हैदराबादचा पराभव करणे गरजेचे आहे.

वाचा-

तिसरी बाब म्हणजे सध्या गुणतक्त्यात असलेले अव्वल तीन संघ त्याच ठिकाणी राहिले तर चेन्नईसाठी फायद्याचे आहे. या तिनही संघांचे स्थान बदलले तरी चालेल पण हेच संघ अव्वल तीनमध्ये असावेत. या शिवाय कोलकाता, राजस्थान, हैदराबाद, पंजाब यांचे १२ पेक्षा अधिक गुण होता कामा नयेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर चेन्नई बाकीचे सर्व सामने जिंकून प्ले ऑफमध्ये जाऊ शकते.

या शिवाय वरील कोणत्याही संघाचे १४ गुण झाले तर चेन्नईला नेट रनरेटचा अडथळा पार करावा लागले. आता महेंद्र सिंह धोनी ज्याने करिअरमध्ये अनेक वेळा अशक्य गोष्टी करून दाखवल्या आहेत. त्याच्यासाठी हे सर्वात कठीण काम असेल. ही गोष्टी जर धोनीने करून दाखवली तर २०२० मधील तो सर्वात मोठा चमत्कार ठरले आणि चेन्नई २०१० प्रमाणे पुन्हा एकदा प्लेऑफमध्ये पोहोचेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here