वाचा-
दिल्ली आणि पंजााब यांच्यात आतापर्यंत २५ लढती झाल्या आहेत त्यापैकी दिल्लीने ११ तर पंजाबने १४ मध्ये विजय मिळवला आहे. या दोन्ही संघात २० सप्टेंबर रोजी झालेला सामना टाय झाला होता. त्यात दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता.
वाचा-
यावर्षाच्या हंगामात सुरुवातीच्या लढती गमावल्यानंतर पंजाबने गेल्या दोन सामन्यात शानदार कमबॅक केले आहे. प्रथम त्यांनी बेंगळुरूचा पराभव केला त्यानंतर मुंबईविरुद्ध डबल सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.
पंजाबसाठीची मोठी डोकेदुखी म्हणजे मधळ्या फळीतील ग्लेन मॅक्सवेलची खराब कामगिरी होय. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला पुढील पाचही लढतीत विजय मिळवाला लागले. या स्पर्धेत पंजाबच्या केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यातच संघात ख्रिस गेलचा समावेश झाल्याने या जोडीवरचा दबाव कमी झाला आहे. निकोलस पूरन देखील स्फोटक खेळी करू शकतो. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे.
वाचा-
दिल्लीचा संघा यावर्षाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. चेन्नईविरुद्धच्या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल. पृथ्वी शॉ गेल्या काही सामन्यात अपयशी ठरला आहे. तो आज मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल. तर शिखर धवन शानदार फॉर्ममध्ये आहे. अक्षर पटेलने गोलंदाजी सोबतच फलंदाजीत कमाल करून दाखवली आहे. दिल्लीची गोलंदाजी आक्रमक असल्यामुळे कमी धावसंख्येचे संरक्षण करू शकतो.
वाचा-
पंतच्या जागी संघात आलेल्या अजिंक्य रहाणेला कामगिरी उंचवावी लागले. या दोघांतील पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. तेव्हा दिल्लीने बाजी मारली होती. त्यामुळे पंजाब यावेळी गेल्यावेळच्या चुका होणार नाही याची काळजी घेईल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times