वाचा-
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू (Glenn ) या वर्षी आयपीएलमध्ये शांत आहे. गेल्या ९ सामन्यात त्याला एकही षटकार मारता आलेला नाही. या स्पर्धेतील सर्वात फ्लॉप फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश होतो. गेल्या वर्षी झालेल्या लिलावात मॅक्सवेलला पंजाब संघाने १०.७५ कोटी रुपयांची बोलू लावून विकत घेतले होते. याआधी २०१४ साली देखील त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली होती. मॅक्सवेलकडून यावेळी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्याने सर्वांना निराश केले.
वाचा-
पंजाब संघाने पहिल्या मॅच पासून ते आतापर्यंत सर्व सामन्यात त्याला संधी दिली. तरी देखील मॅक्सवेल चांगली कामगिरी करू शकला नाही. ९ सामन्यातील ८ डावात त्यांना फक्त ५८ धावा केल्या आहेत. नाबाद १३ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. त्याने फक्त ५ चौकार मारले आहेत. तर स्फोटक खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने अद्याप एकही षटकार मारलेला नाही.
वाचा-
मॅक्सवेलच्या खराब कामगिरीमुळे संघाचा त्याच्या वरील विश्वास कमी होत चालला आहे. मुंबई विरुद्धच्या दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ख्रिस गेल सोबत मयांक अग्रवालला पाठवले. खर तर मॅक्सवेल हा हार्ड हिटसाठी ओळखळा जातो. पण खराभ फॉर्ममुळे संघाने त्याचा विचार केला नाही. याच कारणामुळे कोलकाताविरुद्ध देखील प्रभसिमरनला आधी फलंदाजीसाठी पाठवले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times