वाचा-
टीम इंडियाचे माजी कर्णधार कृष्णमनचारी (k srikanth) यांनी धोनीवर जोरदार टीका केली. या वर्षीच्या आयपीएलमध्ये धोनीची संघ निवड ही हस्यास्पद आणि बकवास आहे. सोमवारी राजस्थानकडून चेन्नईचा स्पर्धेतील सातवा पराभव झाला. चेन्नई गुणतक्त्यात सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सारखी कामगिरी कोणत्याच संघाला करता आली नाही. या संघाने जेव्हा स्पर्धेत भाग घेतला तेव्हा ते प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. पण वर्षी चेन्नई पहिल्या चार मध्ये जागा मिळवेल असे दिसत नाही. सामना झाल्यानंतर धोनीने युवा खेळाडूंच्यात स्पार्क दिसला नाही त्यामुळे संघात घेतले नाही, असे सांगितले.
वाचा-
धोनीच्या या वक्तव्यावर माजी निवड समिती प्रमुख श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली. खास करून पीयुष चावला आणि केदार जाधव यांना पुन्हा पुन्हा संघात घेतल्याबद्दल त्यांनी हल्ला चढवला. जाधवबाबत बोलताना ते म्हणाले, त्याला मैदानात चालण्यासाठी स्कूटरची गरज लागते.
वाचा-
धोनी ज्या प्रक्रियेबद्दल बोलत आहे ती मला पटत नाही. जो सातत्याने प्रक्रियेबद्दल बोलत आहे. ज्याला काहीच अर्थनाही. तुम्ही सातत्याने प्रक्रियेबद्दल बोलू शकता पण निवड प्रक्रिया योग्य नाही, असे श्रीकांत म्हणाले.
वाचा-
श्रीकांत हे आयपीएलच्या पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर देखील होती. ते म्हणाले, एन जगदीशन चांगला खेळाडू असून त्याला संधी दिली गेली नाही. त्याला फक्त एक मॅचमध्ये संधी दिली त्याने बेंगळुरू विरुद्ध ३३ धावा केल्या. तर केदार जाधवने ८ सामन्यात ६२ धावा केल्या. तो कोणत्याही प्रकारचा प्रभाव टाकू शकला नाही.
धोनीला काय म्हणायचे आहे की, जगदीशनमध्ये स्पार्क नाही. पण स्कूटर जाधवमध्ये स्पार्क आहे? धोनी म्हणतो की दबाव नाही तर तो युवा खेळाडूंना कधी संधी देणार. त्याला जगदीशनमध्ये स्पार्क दिसला नाही का? पीयुष चावला आणि केदार जाधवमध्ये काय स्पार्क दिसला? असा सवाल श्रीकांत यांनी केला.
धोनी एक मोठा खेळाडू आहे. यात काहीच शंका नाही. पण मला त्याची ही गोष्ट पटत नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times