राजकोट: भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा () याने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा विक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोट येथे सुरू असलेल्या सामन्यात रोहितने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ७ हजार धावा केल्या.

हिटमॅन रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १८वी धाव घेताच त्याने वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगाने ७ हजार धावांचा विक्रम केला. वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने इतक्या वेगाने ७ हजार धावांचा टप्पा गाठला नाही. या क्रमवारीत रोहितने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम अमला () आणि भारताचा मास्टर ब्लास्टर () यांना मागे टाकले.

वाचा-

रोहितने १३७व्या डावात ओपन म्हणून ७ हजार धावा पूर्ण केल्या. वनडेमध्ये ७ हजार धावा करण्यासाठी अमलाने १४७ डाव खेळले होते. तर सचिन तेंडुलकरने १६० डावात ही कामगिरी केली होती.

वाचा-

वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा ९ हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. त्याने खालच्या क्रमांकावर देखील फलंदाजीकरत २ हजार धावा केल्या आहेत. रोहित २०१३ मध्ये वनडेमध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्यास सुरूवात केली. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने रोहितला खालच्या क्रमांकावरून थेट ओपनर म्हणून संधी दिली होती. रोहितने असा एकमेव फलंदाज आहे ज्याने वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतक झळकावली आहेत.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here