बॉलीवूडमधील अभिनेत्री करिना कपूरला आपला मुलगा तैमूर हा आयपीएलमध्ये खेळावा, असे वाटत आहे. करिनाने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तैमूर हा फलंदाजी करताना दिसत आहे. या फोटोखाली, तैमूरलाही आयपीएलमध्ये संधी द्या, असे करिनाने म्हटले आहे. पण ही गोष्ट फक्त या एका गोष्टीवर थांबलेली नाही. तर आयपीएलमधील एका दिग्गज संघाने आपण तैमूरला संधी देऊ, असेही म्हटले आहे. तैमूरचे आजोबा नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी भारतीय संघाचे कर्णधारपदही भूषवले होते. त्यानंतर तैमूर क्रिकेटमध्ये येणार का, याची चर्चा चाहते करताना दिसत आहेत.

करिनाने इंस्टाग्रामवर तैमूरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तैमूर फलंदाजी करताना दिसत आहे. या फोटोखाली करिनाने म्हटले आहे की, ” मला संधी मिळेल का, मलाही आयपीएलमध्ये खेळायचे आहे.” करिनाच्या या प्रश्नाला आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने उत्तर दिले आहे. सध्याच्या घडीला दिल्लीचा संघ हा आयपीएलच्या गुणतालिकेतमध्ये अव्वल स्थानावर आहे.

दिल्ली कॅपिटल्सने करिनाच्या प्रश्नावर म्हटले आहे की, ” तैमूरला दिल्लीच्या संघाकडून खेळताना आम्हाला नक्कीच आवडेल. एखाद्या नवाबाचा मुलगा हा नेहमीच राजधानीच्या शहराचा असतो.” करिनाने तैमूरबाबत केलेली ही पोस्ट सध्याच्या घडीला चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या उत्तरानंतरही बरेच चाहते सुखावले आहे.

सध्याच्या घडीला आयपीएलचा ज्वर चांगलाच चढलेला आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आपला मुलगा आयपीएलमध्ये दिसावा असे वाटत असते, या गोष्टीला करिनाचा अपवादही नाही. त्यामुळेच करिनाने आपल्या सोशल मीडियावर अशी पोस्ट केली होती. कदाचित आजोबांनंतर आपला मुलगा या कुटुंबातून क्रिकेट खेळू शकतो, असे करिनाला वाटत असावे. त्यामुळेच तिने अशी पोस्ट केल्याचे काही चाहत्यांना वाटत आहे. पण सध्याच्या घडीला तरी ही पोस्ट आणि सोशल मीडियावरील सर्व गोष्टी या मनोरंजनाच्या नजरेतून पाहिल्या जात आहेत. पण कदाचित तैमूर हा क्रिकेटकडे वळणार का आणि आपल्या कुटुंबाचे नाव उंचावणार का, याची उत्सुकताही काही चाहत्यांना असेल,

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here