वाचा-
चेन्नईच्या सात पराभवानंतर कर्णधार धोनीच्या कामगिरीवर आता टीका सुरू झाली आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने () चेन्नई संघाच्या कामगिरीवर हल्ला चढवला. युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हणाला, चेन्नई एक्स्प्रेसची आता मालगाडी झाली आहे आणि ती फार हळूहळू चालत आहे. सीएसकेसाठी ही स्पर्धा जवळ जवळ संपली आहे.
वाचा-
राजस्थानविरुद्धची मॅच त्यांच्यासाठी फार महत्त्वाची होती. जर त्यांनी सर्व सामने जिंकले तरी १४ गुण होतील. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.
वाचा-
चेन्नई संघाने केदार जाधवला संधी दिल्यावरून देखील आकाश चोप्राने टीका केली. राजस्थान विरुद्ध टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय योग्य होता. पण केदार जाधवला संधी का दिली? मला स्वत:ला केदार आवडतो पण त्याचा क्रम निश्चित नाही. त्याला खालच्या क्रमांकावर पाठवले आणि सर्व काही चुकले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times