दुबई : धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल हा किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघासाठी लकी ठरत असल्याचे सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. कारण गेल संघात आल्यावर पंजाबच्या विजयाची गाडी सुसाट धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या सामन्यात तर गेलने काच षटकात तब्बल २४ धावा वसूल केल्याचे पाहायला मिळाले. गेलच्या या स्फोटक फलंदाजीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पंजाबने गेलला पहिल्या सात सामन्यांमध्ये खेळवले नव्हते. या सात सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाला फक्त एकच विजय मिळवता आला होता. पण गेल्या तीन सामन्यांपासून गेल हा पंजाबच्या संघात आला आहे आणि गेले तिन्ही सामने पंजाबच्या संघाने जिंकलेले पाहायला मिळत आहे. गेल पहिल्यांदा आरसीबीबरोबर खेळला, या सामन्यात पंजाबने अखेरच्या षटकात विजय मिळवला होता. त्यानंतर गेल दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरला होता. या सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईवर विजय मिळवला होता. आजचा गेलचा यंदाच्या आयपीएलच्या मोसमातील तिसरा सामना होता. या सामन्यात पंजाबने अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघावर मोठा विजय मिळवला. त्यामुळे गेल हा पंजाबच्या संघासाठी लकी ठरत असल्याचेच सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे.

आज दिल्लीविरुद्धच्या सामन्यात गेलने तर एकाच षटकात २४ धावा लुटल्याचे पाहायला मिळाले. मुंबईचा युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हे षटक टाकत होता. गेलने या षटकाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. गेलने या षटकात दोन षटकार लगावले तर तीन चौकारही वसूल केले. त्यामुळे गेलचा हा आक्रमक पवित्रा आजच्या सामन्यातही पाहायला मिळाला. त्यामुळे आता पंजाबच्या चौथ्या सामन्यात काय होणार, याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना असेल.

पंजाबच्या संघाने आजच्या दहाव्या सामन्यात त्यांनी विजयासह दोन गुण मिळवले. या दोन गुणांसह पंजाबचा संघ आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे आता पंजाबचा संघ अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here