नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दुखापतीमुळे ऋषभ पंत संघाबाहेर आहे. पंतच्या जागी संजू सॅममन याचा विचार केला जाईल अशी शक्यता होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. बीसीसीआयने संजूची दखल न घेतल्याबद्दल त्याने अजब ट्वीटकरत प्रतिक्रिया दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत पंत जखमी झाला होता. त्यामुळे पुढील दोन सामन्यांसाठी तो उपलब्ध नसेल असे बीसीसीआयने सांगितले होते. पंतच्या ऐवजी पहिल्या सामन्यात केएल राहुल याने विकेटकीपर म्हणून जबाबदारी पार पाडली होती. दुसऱ्या सामन्यासाठी पंतच्या ऐवजी विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनची निवड केली जाईल अशी चर्चा होती.

वाचा-

आज सामना सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने संजूच्या ऐवजी आंध्र प्रदेशच्या के.एस भरत याचा संघात समावेश केला. बीसीसीआयने आपली दखल घेतली नाही यावर संजूने अजब ट्वीट केला. संजूने ट्विटवर फक्त एक स्वल्पविराम पोस्ट केला आहे. त्यानंतर त्याच्या ट्वीटवर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली.

नेटिझन्स संजूच्या या ट्वीटचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक युझर्स त्याच्या या ट्विटला डी-कोड करत प्रतिक्रिया देत आहेत. गेल्या काही वर्षात संजूने प्रथम श्रेणी आणि भारताच्या अ संघाकडून शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे पंतच्या जागी त्याचा विचार करायला हवा होता, असे काही चाहत्यांनी म्हटलंय. बीसीसीआयने संजू विचार न केल्यामुळे नारज होत त्याने अशा प्रकारचे ट्वीट केल्याचे काही युझर्सचे म्हणणे आहे.

वाचा-

२०१५मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध संजूने टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याला १० जानेवारी २०२० रोजी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली. दरम्यानच्या काळात संजूने विजय हजारे ट्रॉफीत ४१० धावा केल्या. तसेच प्रथम श्रेणीत नाबाद २१२ ही सर्वोच्च खेळी केली. सैयद्द मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने ११२ धावा केल्या होत्या.

वाचा-

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here