दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात पंजाब संघाने एकच खळबळ उडवली आहे. स्पर्धेतील पहिल्या ७ सामन्यात फक्त एक विजय मिळून आठव्या स्थानावर असेलल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने दुसऱ्या सत्रात सलग ३ विजय मिळून गुणतक्त्यात ५व्या स्थानावर झेप घेतली आहे. पंजाबने गुणतक्त्यातील आघाडीच्या दिल्ली आणि मुंबईचा पराभव केला. त्याआधी पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर विजय मिळवला होता.

वाचा-

काल (मंगळवार) दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवल्यानंतर किंग्ज इलेव्हनचा कर्णधार ()ने सांगितले की, आम्ही गुणतक्त्यातील अव्वल स्थानावर असलेल्या संघांचा पराभव करण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण विरुद्ध गेला सामना सुपर ओव्हरपर्यंत गेल्यानंतर रात्रभर झोप लागली नाही.

वाचा-

दिल्लीविरुद्ध पाच विकेटनी विजय मिळवल्यानंतर राहुल म्हणाला, गेल्या दोन सामन्यात आम्ही गुणतक्त्यातील टॉपच्या दोन संघांचा पराभव केलाय. मी गेल्या मॅचनंतर झोप शकलो नाही. तो सामना आम्ही आधीच जिंकायला हवा होता. सुपर ओव्हरमध्ये जाऊ देण्याची गरज नव्हती. त्या सामन्यात आम्हाला विनम्र राहण्याचे शिकवले.

वाचा-

जेव्हा तुम्ही सहा फलंदाज आणि एक ऑलराउंडरसोबत खेळता तेव्हा पहिल्या चार पैकी एकाला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. कोणाला तरी एकाला अखेर पर्यंत थांबावे लागते, असे राहुल म्हणाला. त्याने संघातील गोलंदाजांचे कौतुक केले. मोहम्मद शमीचा आत्मविश्वास गेल्या सामन्यापासून वाढला आहे. तो प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत आहे. अर्शदिप सिंहने पॉवर प्ले मध्ये दोन तर डेथ ओव्हरमध्ये एक ओव्हर टाकली. तो यार्कर चांगला टाकतो.

वाचा-

पंजाब विरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, आम्हाला १० धावा कमी पडल्या. तुषार देशपांडेच्या दोन ओव्हरमध्ये ४१ दिल्या. सर्वांसाठी हा एक चांगला अनुभव होता. यातून शिकता आले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here