राजकोट: शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत ५० षटकात ६ बाद ३४० धावा केल्या. मालिकेत १-०ने पिछाडीवर असलेल्या भारताने या सामन्यात दोन बदल केले. तर कर्णधार विराट कोहली पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ९६ धावा केल्या.

राजकोट येथे सुरू असलेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताने पंतच्या ऐवजी मनिष पांडे तर शार्दुल ठाकूरच्या ऐवजी नवदीप सैनी यांना संधी दिली. भारताच्या डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा ४२ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. शिखर वनडेमधील शतक झळकावणार असे वाटत होते. पण तो ९६ धावांवर बाद झाला.

वाचा-

त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर सात धावा करुन बाद झाला. श्रेयसच्या जागी आलेल्या केएल राहुल आणि विराट यांनी चौथ्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. विराट शतक करेल असे वाटत होते. पण षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. विराटने ७८ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर मनिष पांडे २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार बाद झाल्यानंतर राहुलने सर्व सूत्रे हाती घेतली. त्याने रविंद्र जडेजासोबत संघाला ३००च्या पुढे नेले. अखेरच्या षटकात राहुल ८० धावांवर धावबाद झाला.

वाचा-

ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने सर्वाधिक ३ तर केन रिजर्ड्सन याने २ विकेट घेतल्या.

वाचा-

या सामन्यात रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ७ हजार धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. तर राहुलने वनडेमध्ये १ हजार धावा केल्या.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here