२०२० सुरू झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्जला काहीना काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रथम दोन खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाली. त्यानंतर सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी माघार घेतली. जेव्हा स्पर्धेतला सुरूवात झाली तेव्हे अपेक्षे प्रमाणे कामगिरी करता आली नाही. आता तर प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी चेन्नई चमत्कारची गरज आहे. अशात ब्राव्हो संघाबाहेर झाला आहे.
चेन्नई संघातील डेथ ओव्हरमधील गोलंदाज
दुखापतीमुळे आणखी काही दिवस अथवा आठवडे आयपीएलमधील सामने खेळू शकणार नाही, असे संघाचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला अखेरच्या षटकात १७ धावा वाचवायच्या होत्या. पण ब्राव्हो गोलंदाजी करू शकला नाही. त्याऐवजी जडेजाने गोलंदाजी केली. त्यानंतर राजस्थानविरुद्धचा सामना देखील ब्राव्हो खेळू शकला नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times