दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात भारतीय युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. या वर्षी विदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ या वर्षी अव्वल स्थानी पोहोचला आहे. संघातील युवा खेळाडू चमकदार खेळी करत आहेत. दिल्ली संघाकडून सलमीला फलंदाजीला येणारा () बद्दल चाहत्यांना मोठ्या आशा आहेत. पृथ्वीने अनेक वेळा चांगली फलंदाजी करून कौतुक मिळवले आहे. पण काल झालेल्या सामन्यात भारताचे माजी क्रिकेटपटू ( ) त्याच्यावर भडकले. जाणून घ्या कारण…

वाचा-

मंगळवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉ ज्या पद्धतीने बाद झाला ते सुनिल गावस्कर यांना आवडले नाही. पृथ्वी शॉ बाद झाला तेव्हा गावस्कर समालोचन करत होते. त्यांनी पृथ्वीच्या मानसिकतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. चौथ्या षटकात अतिशय खराब शॉट खेळून पृथ्वी बाद झाला.

गावस्कार यांनी पृथ्वीवर खराब पद्धतीने बाद झाल्याबद्दल टीका केली. त्यांनी पृथ्वीला एक खराब मानसिकता असलेला खेळाडू असल्याचे म्हटले. पृथ्वी ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर गावस्कर प्रचंड नाराज झाले.

वाचा-

आकाश चोप्रा सोबत समालोचन करताना ते म्हणाले, मला तर या खेळाडूची मानसिकता ठिक वाटत नाही. या खेळाडूची मानसिकता खराब आहे. तुम्ही काय म्हणून शकता या पद्धतीने विकेट टाकण्याची काय गरज होती. जर चेंडू तुम्ही लॉग ऑनच्या वरून मारू शकता तर षटकार जाऊ शकतो आणि लोक तुमचे कौतुक करतील.

वाचा-

दिल्ली कॅपिटल्सला या सामन्यात पाच विकेटनी पराभव स्विकारावा लागला. शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर त्यांनी १६४ धावा केल्या. पृथ्वीने ११ चेंडूत ७ धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here