वाचा-
पंजाबकडून निकोलस पूरनने अर्धशतकी तर ख्रिस गेलने वादळी खेळी केली. पूरनने २८ चेंडूत ५३ धावा केल्या. पूरनला बाद करण्याची एक चांगली संधी दिल्लीकडे होती. पण त्याला ऋषभ पंतने () जीवनदान दिले.
वाचा-
आठव्या षटकात अश्विनने पूरनचा चेंडू ऑफ साइडला मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. धवनने चेंडू पकडला आणि वेगाने पंतकडे दिला. पंत विकेटपासून थोडा दूर होता. त्याने ड्राइव्ह मारत चेंडू पकडला आणि धोनीच्या स्टाइलने स्टंपवर मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही विकेट्सना लागला नाही. पूरन रन आउट होण्यापासून वाचला. पंतने जर चेंडू योग्य पद्धतीने मारला असता तर पूरन बाद झाला असता. यावर शिखर धवन आणि दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर यांना राग आवरता आला नाही.
वाचा-
वाचा-
या जीवनदानाचा पूरनने भरपूर फायदा उचलला. त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. पूरनची विकेट रबाने घेतली. पण तोपर्यंत फार उशीर झाला होती. पंजाब विजयाच्या जवळ पोहोचला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times