अबुधाबी: आपल्या घरच्या मैदानातच केकेआरच्या संघाने आरसीबीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसबीच्या संघाने आजच्या सामन्यात अचूक आणि भेदक मारा केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच केकेआरला या सामन्यात आरसीबीपुढे फक्त ८५ धावांचे आव्हान ठेवता आले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यावेळी तिखट मारा करत चार षटकांमध्ये तीन फलंदाजांना बाद करत फक्त आठ धावाच दिल्या, त्याचबरोबर सिराजने यावेळी दोन षटके निर्धावही टाकल्याचे पाहायला मिळाले.

केकेआरच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय केकेआरच्या चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. कारण केकेआरला यावेळी दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यावेळी दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर केकेआरच्या राहुल त्रिपाठीला बाद केले. राहुलला यावेळी फक्त एकच धाव करता आले. यानंतरच्याच चेंडूवर सिराजने नितिश राणाला तंबूचा रस्ता दाखवला. राणाला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. यावेळी हॅट्ट्रिक घेण्याची संधी सिराजकडे होते. पण त्यामध्ये त्याला अपयश आले.

आरसीबीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने यावेळी तिसऱ्याच षटकात केकेआरला तिसरा धक्का दिला. सैनीने यावेळी केकेआरचा सलामीवीर शुभमन गिलला बाद केले आणि केकेआरला तिसरा धक्का दिला. यावेळी केकेआरची ३ बाद ३ धावा अशी बिकट अवस्था झाली होती. त्यावेळी अनुभवी दिनेश कार्तिक फलंदाजीला आला आणि संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण या सामन्यात कार्तिकला फक्त चार धावाच करता आल्या. त्याचबरोबर सिराजने केकेआरच्या संघात पुनरागमन करणाऱ्या टॉम बँटनला १० धावांवर बाद केले. सिराजचा हा तिसरा बळी होता.

केकेआरचा अर्धा संघ यावेळी फक्त ३२ धावांमध्ये तंबूत परतलेला होता. त्यानंतर केकेआरला पॅट कमिन्सच्या रुपात सहावा धक्का बसला. आरसीबीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने यावेळी कमिन्सला बाद करत केकेआरला सहावा धक्का दिला. त्यावेळी केकेआरची ६ बाद ४० अशी दयनीय अवस्था होता. पण त्यावेळी केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन हा खेळपट्टीवर होता आणि संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण मॉर्गन अखेरपर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडून राहू शकला नाही. मॉर्गानने यावेळी तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३० धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here