अबुधाबी: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीसीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर सहजपणे मोठा विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळेच केकेआरला आरसीबीुपुढे विजयासाठी फक्त ८५ धावांचे आव्हान ठेवले होते. आरसीबीने यावेळी आठ विकेट्स राखत केकेआरवर मोठा विजय मिळवल्याचे पाहायला मिळाले. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत मोठी झेप घेऊ शकतो, असे दिसत आहे.

केकेआरच्या ८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी एकही विकेट न गमावता ४४ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर सातव्या षटकात आरसीबीला दोन धक्के बसले. ल्युकी फर्ग्युसनने यावेळी सलामीवीर आरोन फिंचला बाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला. या षटकामध्येच आरसीबीला दुसरा धक्का बसला. कारण आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल यावेळी धावचीत झाल्याचे पाहायला मिळाले. देवदत्तला यावेळी २५ धावांवर समाधान मानावे लागले.

एका षटकात दोन विकेट्स मिळवल्यावर केकेआरच्या संघाने काही काळ आरसीबीच्या संघावर दबाव बनवला होता. पण त्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि गुरकिरत सिंग यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे पाहायला मिळाले. कोहली आणि सिंग या दोघांनी स्थिरस्थावर झाल्यावर केकेआरच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्ला चढवल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी केकेआरच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि संघाला मोठा विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. कोहलीपेक्षा सिंगने या सामन्यात जलदगतीने धावा जमवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच आरसीबीला सहजपणे या आव्हानाचा पाठलाग करता आला.

आपल्या घरच्या मैदानातच केकेआरच्या संघाने आरसीबीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसबीच्या संघाने आजच्या सामन्यात अचूक आणि भेदक मारा केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच केकेआरला या सामन्यात आरसीबीपुढे फक्त ८५ धावांचे आव्हान ठेवता आले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यावेळी तिखट मारा करत चार षटकांमध्ये तीन फलंदाजांना बाद करत फक्त आठ धावाच दिल्या, त्याचबरोबर सिराजने यावेळी दोन षटके निर्धावही टाकल्याचे पाहायला मिळाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here