या सामन्यापूर्वी आरसबीच्या संघाने नऊ सामने खळले होते. या नऊ सामन्यांमध्ये आरसीबीने सहा लढतींमध्ये विजय मिळवले होते, तर त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभवही पत्करावा लागला होता. आजच्या दहाव्या सामन्यात आरसीबीच्या संघाने केकेआरवर मोठा विजय मिळवला. या विजयासह केकेआरच्या संघाने गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ हा १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. पण आजच्या सामन्यात दोन गुण पटकावल्यामुळे आरसीबीचे १४ गुण झाले आहेत. त्यामुळे १४ गुणांसह आरसीबीच्या संघाने गुणतालिकेत मुंबईला धक्का देत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
केकेआरच्या संघाने यापूर्वी नऊ सामने खेळले होते. या नऊ सामन्यांमध्ये केकेआरने पाच लढतींमध्ये विजय मिळवले होते, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आजच्या दहाव्या सामन्यात त्यांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दहा सामन्यांनंतर केकेआरला पाचवा पराभव पत्करावा लागला आहे. पण या पराभवानंतरही गुणतालिकेत त्यांच्या स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. कारण या सामन्यापूर्वी केकेआर चौथ्या स्थानावर होता आणि आताही त्याच स्थानावर आहे. कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये १० गुण पटकावत त्यांनी आपले स्थान कायम राखले आहे.
सध्याच्या घडीला गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. आजच्या सामन्यानंतर आरसीबीचा संघ हा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पण मुंबईच्या संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झालेली आहे. पण या पराभवानंतरही केकेआने आपले गुणतालिकेतील चौथे स्थान कायम राखले आहे. आता आयपीएलमध्ये सध्याच्या घडीला विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल चार स्थान कोणते संघ राखतात, याचीच उत्सुकता चाहत्यांना जास्त असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times