वाचा-
दोन्ही संघ गुणतक्त्यात जवळ आहेत. राजस्थान सहाव्या तर हैदराबाद सातव्या स्थानावर आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो वा मरो असा आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत १२ लढती झाल्या आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी ६ लढती जिंकल्या आहेत.
वाचा-
राजस्थानने चेन्नई विरुद्ध गेल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल. या सामन्यात विदेशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. तर सनरायजर्सचा कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला होता.
वाचा-
या दोन्ही संघात २०२० मध्ये याआधीची लढत ११ ऑक्टोबर रोजी झाला होता. त्या लढतीत हैदराबादने ५ बाद १५८ धावा केल्या होत्या. विजयाचे लक्ष्य गाठताना राजस्थानने ५ बाद ७८ धावा केल्या होत्या. त्यानंतर राहुल तेवतिया आणि रियान पराग यांनी ४७ चेंडूत ८५ धावा करत संघाला विजय मिळून दिला होता.
संभाव्य संघ
राजस्थान रॉयल्स-
बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन (विकेटकिपर), स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, राहुल तेवतिया, रियान पराग, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी
सनरायजर्स हैदराबाद-
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मनिष पांडे, केन विलियमसन, प्रियम गर्ग, विजय शंकर, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, खलील अहमद, टी नटराजन
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times