वाचा-
चेन्नईने १० पैकी फक्त ३ सामन्यात विजय मिळवला आहे. आता शिल्लक चार सामन्यात विजय मिळून देखील त्यांना अन्य संघांच्या कामगिरीवर प्लेऑफमध्ये जागा मिळणार की नाही हे निश्चित होणार आहे. अशात ब्राव्हो दुखापतीमुळे बाहेर गेला. तो खेळणार नसला तरी चाहत्यांना संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
वाचा-
चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ब्राव्हो म्हणतो, ही एक वाईट बातमी आहे. माझा संघ चेन्नई सुपर किंग्ज सोडून जात आहे. मला खुप वाईट वाटत आहे. मी चेन्नईच्या सर्व चाहत्यांना इतक सांगू इच्छितो की संघाला आत्मविश्वास वाढवत रहा, त्यांना सपोर्ट करत रहा.
वाचा-
हा हंगाम चाहत्यांना जसा हवा होता तसा नाही. आम्ही बेस्ट दिले. पण अनेक वेळा सर्वोत्तम दिल्यानंतर देखील असे निकाल लागतात. आम्हाला पाठिंबा देत रहा. मी विश्वास देतो की आम्ही एक मजबूत आणि चॅम्पियन्ससारखे कमबॅक करू. आम्ही सर्वात यशस्वी संघ आहोत. मला वाटते की चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य आणि फॅन असल्याबद्दल गर्व वाटला पाहिजे.
वाचा-
वाचा-
ब्राव्होने या हंगामात ६ सामने खेळत आहे. त्याने ८.५७च्या सरासरीने ६ विकेट घेतल्या आहेत. त्याला फक्त दोन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यात तो फक्त ७ धावा करू शकला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या अखेरच्या लढतीत जखमी झाल्यामुळे अखेरची ओव्हर तो टाकू शकला नाही. दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. अक्षर पटेलने रविंद्र जडेजाला ३ षटकार मारत दिल्लीला विजय मिळवून दिला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times