वाचा-
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये गोलंदाजी केली आहे. त्याच्या नावावर एक विकेट देखील आहे. आयसीसीने सोशळ मीडियावर धोनीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विकेटचा व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना आयसीसीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, कर्णधार, फलंदाज, विकेटकिपर एमएस , गोलंदाज? का नाही!
वाचा-
भारताच्या या माजी कर्णधाराची एकमेव आंतरराष्ट्रीय विकेट, जुन्या आठवणी पुन्हा एकदा जगूयात…
धोनीने पहिली आंतरराष्ट्रीय सामन्यातील विकेट २००९ साली आयसीसीच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध घेतली होती. धोनीने वेस्ट इंडिजचा फलंदाज ट्रेविस डाउलिनला बोल्ड काढले होते. त्याच्या ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूवर ट्रेविसने सलग दोन चौकार मारले. त्यानंतर धोनीने तिसरा चेंडू शानदार टाकला ज्यावर ट्रेविस बोल्ड झाला.
वाचा-
जेव्हा धोनीने ट्रेविसला बाद केले तेव्हा तो एकटक पाहत बसला. धोनीने ही विकेट घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला. धोनीचा हा करिअरमधील १४५वा सामना होता. त्याआधी त्याने कधीच वनडेत गोलंदाजी केली नव्हती. धोनीने ३५० वनडेत फक्त एक विकेट घेतली. तर कसोटी करिअरमध्ये २ ओव्हरमध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही.
वाचा-
सध्या धोनी आयपीएल २०२० खेळण्यासाठी युएईमध्ये आहे. त्याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आजवरची सर्वात खराब कामगिरी केली आहे. १० पैकी त्यांना फक्त ३ सामन्यात विजय मिळवता आला आहे. जर CSKला प्ले ऑफमध्ये जाता आले नाही तर आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times