नवी दिल्ली: भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक त्रिशतक झळकावणारा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम फक्त दोन खेळाडू मोडू शकतात असे सांगितले. वीरू की बैठक या कार्यक्रमात सेहवागने लाराचा १६ वर्ष जुना विक्रम मोडणाऱ्या खेळाडूंची नावे सांगितली.

वाचा-

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करम्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. त्याने एका डावात नाबाद ४०० धावा केल्या होत्या. विरेंद्र सेहवागच्या मते लाराचा हा विक्रम मोडण्याची क्षमता फक्त दोनच खेळाडूंमध्ये आहे. यापैकी पहिला खेळाडू म्हणजे भारताचा सलामीवीर रोहित शर्मा होय आणि दुसरा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा होय.

वाचा-

विरेंद्र सेहवागने काही दिवासांपूर्वी एक शो सुरू केला आहे. वीरू की बैठक या शोमध्ये लाराच्या विक्रमाचा उल्लेख करताना सेहवाग म्हणाला, जर लाराचा हा विक्रम कोणी मोडू शकत असेल तर ते एक तर डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा होय. रोहित दीड दिवसात लाराचा विक्रम मोडू शकतो.

वाचा-

रोहितची कामगिरी

आकडेवारीवर नजर टाकली तर रोहित शर्माची कसोटीमधील कामगिरी फार चांगली नाही. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या २१२ आहे. रोहितने वनडेत ३ वेळा द्विशतक झळकावले आहे.

वाचा-

स्वत: सेहवागने कसोटीत दोन त्रिशतक केली आहेत. सेहवागच्या मते तो घाईत असायचा त्यामुळे लाराचा विक्रम कधी मोडू शकला नाही. विरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरुद्ध ३०९ तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३१९ धावांची खेळी केली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here