नवी दिल्ली: भारताचे विश्वविजेते माजी कर्णधार यांना काल मध्यरात्री एक वाजता ह्रदय विकाराचा झटका आला. त्यानंतर देव यांना नवी दिल्ली येथील फोर्टीस रुग्णालात दाखल करण्यात आले. देव यांच्यावर अँजिओप्लॅस्टी करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. देव यांची प्रकृती सध्याच्या घडीला स्थिर आहे आणि त्यांना काही दिवसांतच घरी सोडण्यात येईल, असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले आहे.

काल मध्यरात्री देव यांच्या छातीत दुखायला लागले होते. त्यामुळे एक वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना एमर्जन्सी विभागात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लॅस्टी करण्यात आली. सध्याच्या घडीला त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे उपचारांनंतर काही दिवसांतच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

देव यांच्याबाबत फोर्टीस हॉस्पिटलने एक पत्रक काढले आहे. या पत्रकामध्ये म्हटले आहे की, ” देव यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये एक वाजता आणण्यात आले. त्यानंतरच लगेचच त्यांना एमर्जन्सी विभागाच हलवण्यात आले. त्यानंतर देव यांच्यावर अँजिओप्लॅस्टी करण्यात आली आहे. डॉक्टर अतुल माथूर यांनी देव यांच्यावर अँजिओप्लॅस्टी केली. सध्याच्या घडीला देव यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे काही दिवसांतच त्यांना उपचारांनंतर घरी सोडण्यात येणार आहे.”

देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ साली विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने बरेच विजय मिळवले होते. गेले काही दिवस ते क्रिकेटपासून लांब असल्याचे पाहायला मिळत होते. पण काल मध्यरात्री एक वाजता त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत.

कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ५२४८ धावा आणि ४३४ बळींची नोंद आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कपिल यांनी ३७८३ धावा केल्या तसेच २५३ बळी घेतले. १९९४ मध्ये फरीदाबाद येथे वेस्ट इंडीज विरूद्ध त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here