रोहितच्या जागी आता सलामीसाठी इशान किशन येणार असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर रोहितच्या जागी मुंबईच्या संघात डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे आता रोहितविना मुंबईचा संघ कशी कामगिरी करणार, याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना असेल. मुंबईच्या संघाने एक पत्रक काढले आहे. या पत्रकामध्ये रोहित आजच्या सामन्यात खेळणार नसून त्याच्या जागी संघाचे नेतृत्व हे किरॉन पोलार्डकडे सोपवण्यात आले आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबईच्या संघानेच ही अधिकृत घोषणा केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
पोलार्डने दिली होती रोहितबाबत माहिती…प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार हे पारितोषिक वितरण समारंभाला येतात. पण रविवारी झालेल्या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा पारितोषिक वितरण समारंभाला आला नाही. रोहितच्याऐवजी पोलार्ड हा पारितोषिक वितरण समारंभाला आला होता. त्यावेळी पोलार्डला रोहितबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पोलार्ड म्हणाला की, ” या सामन्यानंतर रोहित शर्माची तब्येत बिघडली आहे. तो थोडासा आजारी पडला आहे. त्यामुळेच मी पारितोषिक वितरण समारंभाला आलो आहे. पण रोहित लवकरच बरा होईल, अशी आम्हा सर्वांना आशा आहे.”
गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना चांगलाच थरारक झाला होता. हा सामना दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत गेला होता. या सामन्यानंतर रोहित शर्मा आजारी असल्याचे समजले होते. त्यानंतर मुंबईच्या संघाने आज रोहितबाबतची अपडेट दिली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times