शारजा: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवाननंतर चेन्नई सुपर किंग्सचे या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. चेन्नईने मुंबईपुढे ११५ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी धडाकेबाज फलंदाजी केली. दोन्ही सलामीवीरांच्या धमाकेजार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने चेन्नईवर १० विकेट्स राखून मोठा विजय साकारला. पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला पराभूत केले होते. पण मुंबईने या पराभवाची सव्याज परतफेड आजच्या सामन्यात केल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईपुढे विजयासाठी ११५ धावांचे फार छोटे आव्हान होते. मुंबईचे सलामीवीर इशान किशन आणि क्विंटन डीकॉक यांनी यावेळी चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या दोघांनी यावेळी अभेद्य शतकी भागीदारी रचत मुंबईला सहज विजय मिळवून दिला. इशान किशनने यावेळी फक्त ३७ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ६८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. क्विंटन डीकॉकने यावेळी ३७ चेडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ४६ धावा केल्या. मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही सलामीवीरांनी यावेळी ११६ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळेच मुंबईला या सामन्यात सहज विजय मिळवता आला.

मुंबई इंडियन्सच्या संघाने आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला आपल्या तालावर चांगलेच नाचवले. मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजांनी यावेळी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईचा संघ यावेळी मुंबईसमोर चांगलाच ढेपाळला. तळाच्या फलंदाजांनी लाज राखल्यामुळे चेन्नईला मुंबईपुढे ११५ धावांचे आव्हान ठेवता आले. चेन्नईच्या सॅम करनने यावेळी अर्धशतक झळकावले. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला शतकाच्यापुढे धावसंख्या उभारता आली. करनने यावेळी चेन्नईकडून एकाकी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. करनने यावेळी ४७ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५२ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. चेन्नईच्या डावाच्या अखेरच्या चेंडूवर सॅम बाद झाला. मुंबईकडून यावेळी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सर्वाधिक चार विकेट्स मिळवले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि फिरकीपटू राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here