नवी दिल्ली: आयपीएलचा १३वा हंगाम एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. शुक्रवारी चेन्नईचा मुंबई इंडियन्सने १० विकेटनी पराभव केला. चेन्नईला प्रथम फलंदाजी करत फक्त ११४ धावा करता आल्या. त्यांच्या पहिल्या चार विकेट ३ धावांवर पडल्या होत्या. तर पॉवर प्ले मध्ये त्यांनी २४ धावा केल्या. इशान कशनच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने १० विकेटनी विजय मिळवला.

वाचा-

चेन्नईच्या या निराश कामगिरीनंतर कर्णधार महेंद्र सिंह निराश झाला. आज करो वा मरो सामन्यात संघ उतरला होता आणि इतिहासातील सर्वात मोठा पराभव झाला. चेन्नईला आजपर्यंत कोणीही १० विकेटच्या अंतराने हरवले नव्हते. या पराभवानंतर धोनी भावूक झाला. संघाच्या कामगिरीवर त्याने जाहीर नाराजी व्यक्त केली. पण त्याच बरोबर तो हे देखील म्हणाला की, मी कर्णधार आहे आणि पळू शकत नाही. पुढील सर्व सामने खेळणार.

वाचा-

सामना झाल्यानंतर तो म्हणाला, खरच फार दु:ख झाले आहे. आता हे पाहावे लागले की काय चुकले आहे. हे वर्ष निश्चितपणे आमच्यासाठी नव्हते. फक्त एक किंवा दोन सामन्यात आम्ही चांगली गोलंदाजी किंवा फलंदाजी केली. संघातील सर्व खेळाडू दु:खी आहेत. सर्व जण सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. पण गोष्टी तुमच्या बाजूने होत नाही.

वाचा-

आता पुढील वर्षी आम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील. लिलाव कसा होणार, आयोजन कोठे होईल, खेळाडूंना कामगिरी करण्याची पूर्ण संधी दिली पाहिजे जेणेकरून ते संपूर्ण कौशल्यपणाला लावतील. येणाऱ्या तीन सामन्याचा फायदा घेतला पाहिजे. पुढील वर्षाच्या तयारीसाठी त्याचा फायदा होईल. आम्हाला फलंदाज आणि गोलंदाजांचा शोध घेतला पाहिजे जे डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतील आणि दबावामध्ये खेळू शकतील.

वाचा-

धोनीला जेव्हा विचारण्यात आले की आता काय करावे लागले, त्यावर तो म्हणाला, कर्णधार पळ काढू शकत नाही, त्यामुळेच पुढील सर्व सामने खेळणार.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here