वाचा-
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने संघात दोन बदल केले आहे. संघाचा सलामीवीर याला वगळण्यात आले असून त्याच्या बदली अजिंक्य रहाणाले संधी देण्यात आली आहे. दिल्लीने एका मुंबईकर खेळाडूला वगळून दुसऱ्या मुंबईकर खेळाडूला संधी दिली आहे.
वाचा-
पृथ्वी शॉ गेल्या काही सामन्यापासून अपयशी ठरला आहे. गेल्या सामन्यात बेजबाबदार शॉट खेळल्यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर त्याच्यावर भडकले होते. त्यांनी या खेळाडूनी मानसिकता बिघडल्याचे वक्तव्य केले होते. दिल्लीने पहिल्या अनेक सामन्यात राहणेला संधी दिली होती. आतापर्यंत त्याने ४ सामन्यात २५ धावा केल्या आहेत.
वाचा-
दिल्लीने केलेला आणखी एक बदल म्हणजे त्यांनी एनरिक नॉर्टे याला संधी दिली आहे. त्याला डॅनियल सॅम्सच्या जागी संधी दिली आहे. कोलकाता संघाने देखील संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी सुनिल नारायण आणि कमलेश नागरकोटी यांना स्थान दिले आहे.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times