धोनीच्या जर्सीचे काही फोटो पाहायला मिळत आहे. सामना संपल्यावर धोनी आपली जर्सी काही खेळाडूंना देत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सबरोबर शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर धोनीने आपल्या सात क्रमांकाची जर्सी हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधूंना दिल्याचे पाहायला मिळाले आहे. धोनीने ही एकच जर्सी दिलेली नाही.
चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सकडूनही पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात चेन्नईच चांगली फलंदाजी करता आली नव्हती. पण तरीही चेन्नईने राजस्थानची चेन्नईने ३ बाद २८ अशी अवस्था केली होती. त्यावेळी चेन्नईच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण त्यावेळी राजस्थानचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरने तुफानी खेळी साकारत नाबाद ७० धावा केल्या होत्या. बटलरच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानने चेन्नईवर विजय मिळवला होता. या सामन्यानंतर धोनीने आपली जर्सी बटलरला दिली होती.
आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने आयपीएलमध्ये असे केल्याचे पाहायला मिळत नाही. आयपीएलचा सामना संपल्यावर धोनी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करत असल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता धोनी यापुढे आयपीएलमध्ये मार्गदर्शक म्हणून दिसेल, असेही चाहते म्हणत आहेत. धोनी कुठेतरी आयपीएलमधून खेळाडू म्हणून निवृत्त होण्याचे संकेत देत असल्याची चर्चा ही क्रिकेट विश्वात रंगत आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाचे या आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मुंबईविरुद्धचा सामना चेन्नईसाठी करो या मरो, असाच होता. चपण या सामन्यात चेन्नईला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे धोनीला आयपीएलमधून निवृत्ती घेण्यासाठी हीच योग्यवेळ आहे, असे म्हटले जात आहे. पण धोनी सर्वांनाच आतापर्यंत धक्का देत आलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही त्याने अशीच सर्वांना धक्का देत निवृत्ती गेतली होती. त्यामुळे धोनी आयपीएलमधून निवृत्ती कशी घेतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times